Ankita Walawalkar : सध्या मराठमोळी इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर ‘बिग बॉस मराठी’मुळे चांगलीच चर्चेत आहे. शोमध्ये प्रवेश केल्यावर तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

अंकिता वालावलकर म्हणजेच ‘कोकण हार्टेड गर्ल’ने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यावर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे आभार मानत अंकिताने खास रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. मात्र, अंकिताचा हा ‘कोकण हार्टेड बॉय’ नेमका कोण आहे याचा उलगडा झालेला नाही. ‘बिग बॉस’च्या घरात देखील अंकिता अनेकदा तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलताना दिसते.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Religion shouldnt justify reservation
इथे मुद्दा मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा नसून, आरक्षणाच्या निकषांचा आहे…
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
six year old daughter of labour Swallowed one rupee coin family seek help for treatment
अल्पवयीन मुलीने नाणे गिळले; गरीब कुटूंबापुढे उपचाराचा खर्च पेलण्याचे आव्हान
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

अंकिता कोकणातील असल्यामुळे गणेशोत्सव या सणाशी तिचं अत्यंत जवळचं नातं आहे. घरच्या बाप्पाला यावर्षी तिने प्रचंड मिस केलं. ‘बिग बॉस’च्या घरात महिन्याभरापूर्वी योगिता चव्हाणशी बोलताना अंकिताने एक खास किस्सा सांगितला होता.

अंकिताने होणाऱ्या नवऱ्याला विचारलेला ‘हा’ प्रश्न

अंकिता ( Ankita Walawalkar ) म्हणाली, “आमच्या घरी मी लहान असल्यापासून गणपती बाप्पा येतो. आम्ही सगळ्या बहिणी असल्याने माझी आजी असा विचार करायची अरे मुलगा पाहिजे… पुढे, गणपती कोण करणार? त्याचवेळी मी ठरवलं होतं की, शेवटपर्यंत मी गणपती बाप्पाचं सगळं काही करणार… पण, काही वर्षांनी आपल्या लक्षात येतं…अरे आपण मोठे होणार, आपलं लग्न होणार मग, तिथे गणपती असेल तर काय करायचं? त्यामुळे माझ्या होणाऱ्या नवऱ्याला ‘हो’ म्हणायच्या आधीच मी त्याला ही गोष्ट विचारली होती.”

हेही वाचा : “चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”

Ankita Walawalkar
Ankita Walawalkar : अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात सांगितला किस्सा

“मी त्याला विचारलं तु्झ्याकडे गणपती असतो? तो म्हणाला ‘हो’… मग मी त्याला विचारलं किती दिवस? तर म्हणाला, ‘७ दिवस’ माझं असं झालं अरे आमच्याकडे पण, ७ दिवस गणपती असतो. मला माझ्या घरचा गणपती करावा लागणारच होता. त्यामुळे कसं होणार? असे सगळे विचार माझ्या डोक्यात सुरू होते.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video: अभिजीत सावंतने निक्की तांबोळीची केली जबरदस्त नक्कल, व्हिडीओ पाहून तुम्हाला होईल हसू अनावर

“माझा होणारा नवरा म्हणाला एक काम कर…तुझ्या घरचा गणपती आपण ९ दिवस करूयात…म्हणजे शेवटच्या दिवशी जाऊ शकतो. पण, मी त्याला म्हणाले, मला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तिथे जावं लागेल कारण, कोणीच नाहीये. त्यानंतर तो म्हणाला, कर काहीच हरकत नाही. माझ्या आईला जेव्हा मी त्याच्याबद्दल सांगितलं तेव्हा तिने देखील त्याला तोच प्रश्न विचारला होता.” असा किस्सा अंकिताने ‘बिग बॉस’च्या ( Ankita Walawalkar ) घरात सांगितला.

Story img Loader