Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan: सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. त्याच्यावर ट्रॉफी जिंकल्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावकर या शोमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिली, तिने सूरज चव्हाण विजेता ठरल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरज चव्हाण व पंढरीनाथ कांबळे यांची बिग बॉस मराठीच्या घरात मैत्री पाहायला मिळाली. पॅडीने सूरजला टास्क समजावून सांगितले. त्याला या घरात अॅडजस्ट करताना अडचण येणार नाही, याची काळजी घेतली होती. सूरजच्या विजयानंतर पंढरीनाथने पोस्ट शेअर केली, तिच पोस्ट स्टोरीला शेअर करत अंकिताने सूरजला सल्ला दिला आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणचे वय अन् शिक्षण किती? जाणून घ्या

पंढरीनाथ कांबळेची पोस्ट नेमकी काय?

पंढरीनाथने सूरज व बिग बॉसच्या ट्रॉफीसह काढलेले फोटो शेअर केले. तसेच सूरजला जिंकवण्यासाठी ज्यांनी मतं दिली, त्या सर्वांचे आभार मानले. “या चेहऱ्यांवर आनंद आणि समाधान देणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार!” असं पंढरीनाथने फोटो शेअर करत लिहिलं.

हेही वाचा – सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरची पोस्ट

“बी टीम आली रे…मिळालेलं खूप छान टिकव आता सूरज, कायम तुझ्यासाठी उभे आहोत,” असं कॅप्शन अंकिताने पॅडी व सूरजचे फोटो रिपोस्ट करत दिलं.

अंकिता वालावलकरची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

बिग बॉसच्या ७० दिवसांच्या प्रवासात आपल्या साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सूरज चव्हाणला मतांच्या रुपात प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि तो या पर्वाचा विजेता ठरला. बारामतीच्या मोढवे गावात एकेकाळी मजुरी करणारा सूरज रील्समुळे व्हायरल झाला आणि लोकप्रिय झाला. त्याला बिग बॉस मराठीची ऑफर मिळाली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं. सूरजला हा शो जिंकल्यावर १४.६ लाख रुपये मिळाले आहेत. या पैशांमधून घर बांधणार असल्याचं सूरज चव्हाणने म्हटलंय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita prabhu walawalkar reacts on suraj chavan winner of bigg boss marathi 5 hrc