Ankita Walawalkar New Car : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे अंकिता वालावलकर महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. गेल्या काही महिन्यांपासून ही ‘कोकण हार्टेड गर्ल’ तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या काही दिवसात अंकिता संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्नगाठ बांधणार आहे. यापूर्वी ‘कोकण हार्टेड गर्ल’ने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे अंकिताच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे.
अंकिताने सोशल मीडियावर ‘ती येतेय’, ‘ती आलीये… वाट बघतेय’ अशा पोस्ट शेअर तिच्या सगळ्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. अंकिताने नेमकं काय सरप्राइज देणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर नव्या गाडीची पहिली झलक तिने फोटो शेअर करत सर्वांना दाखवली आहे. अंकिता वालावलकरने ऑडी ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. गाडीचा पहिला फोटो शेअर करत याला ‘कोकण हार्टेड गर्ल’ने ‘आवडी आली’ असं कॅप्शन दिलं आहे.
गाडी खरेदी करताना अंकितासह ( Ankita Walawalkar ) तिचा होणारा नवरा कुणाल देखील उपस्थित होता. काही दिवसांपूर्वीच तिने आपली पहिली कार विकली होती. ही कार विकल्यावर अंकिताने, दुसरी गाडी घ्यायचा विचार होता म्हणून जुनी गाडी विकली. सध्या मी दोन-तीन गाड्यांमध्ये कन्फ्युज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे अंकिता लवकरच नवीन गाडी खरेदी करेल याची हिंट सर्वांना आधीच मिळाली होती. अखेर नव्या गाडीचा फोटो शेअर करत ‘कोकण हार्टेड गर्ल’ने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी नवीन गाड्या खरेदी केल्याचं पाहायला मिळालं आहे. यात आता अंकिताचं नाव देखील जोडलं गेलं आहे. अंकिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिला प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखलं जातं. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. या सीझनच्या महाअंतिम फेरीपर्यंत ती पोहोचली होती.
आता वैयक्तिक आयुष्यात लवकरच कोकण हार्टेड गर्ल ( Ankita Walawalkar ) विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या नव्या गाडीसाठी सगळ्या चाहत्यांनी अंकितावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.