Ankita Walawalkar : ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमामुळे गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर रील्स व्हिडीओ बनवून ती घराघरांत लोकप्रिय झाली. अंकिता मूळची कोकणातली आहे. २०१६ मध्ये आपलं करिअर घडवण्यासाठी ती मुंबई आली अन् बघता-बघता आता लोकप्रिय सोशल मीडिया स्टार झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यावर अंकिताने लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय तिने शोमध्ये होणारा नवरा संगीत दिग्दर्शक असल्याचं देखील सांगितलं होतं. मात्र, एवढे दिवस तिने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवला नव्हता. पण, दुसरीकडे नेटकऱ्यांनी अंकिताचा बॉयफ्रेंड कोण असेल याचा अचूक अंदाज बांधला होता.

अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ने ( Ankita Walawalkar ) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. “सूर जुळले…” असं कॅप्शन देत तिने होणारा नवरा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कुणाल भगत असल्याचं सर्वांना सांगितलं. यानंतर अंकितावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. याचदरम्यान, या सोशल मीडिया स्टारने शेअर केलेला आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये अंकिता लग्नाची बातमी सर्वात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली असं सांगत आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…

Dance video done by grandparents in kolhapur on marathi song halagi tune is currently going viral on social media
कोल्हापूर म्हणजे नादच खुळा! आजी अन् आजोबा हलगीवर जबरदस्त थिरकले; एका VIDEO मुळे झाले फेमस
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
Heart touching Advertise banner against son from father life lessons for son photo viral on social media
Photo: “कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये” वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावी अशी जाहिरात; नक्की वाचा
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड

हेही वाचा : Bigg Boss 18: बिग बॉसला पहिल्याच आठवड्यात अडचणीत आणणारा सदस्य घराबाहेर, कोण आहे तो? जाणून घ्या

अंकिता काय म्हणाली?

अंकिता ( Ankita Walawalkar ) म्हणते, “नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरातील तुम्ही माझा प्रवास पाहिला. मी खूप जास्त इमोशनल मुलगी आहे. जेव्हा आमचं लग्न ठरत होतं तेव्हाची एक गोष्ट… आमच्या दोघांचे बरेच गुण जुळतात, त्यात आमचा एक गुण जुळला तो म्हणजे आमचे इमोशन्स. त्या इमोशन्समधली एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माननीय राज ठाकरे. काही दिवसांपूर्वी ‘येक नंबर’ चित्रपटाचं काम चालू होतं आणि मला जेव्हा समजलं की, कुणाल या चित्रपटासाठी काम करतोय. तेव्हा मला खूपच आनंद झाला होता. य़ादरम्यान, राज साहेबांना आम्ही सगळ्यात आधी आमच्या लग्नाची बातमी दिली होती.”

“राज साहेबांना आम्ही या गुढीपाडव्यालाच लग्नाबद्दल सांगितलं होतं. पण, त्यानंतर ‘बिग बॉस’मुळे सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या. ‘येक नंबर’ चित्रपटातल्या ‘तू आभाळ’ गाण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतलीये आणि त्या गाण्याबरोबर आमच्या अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत.” असं अंकिता वालावलकरने ( Ankita Walawalkar ) यावेळी सांगितलं.

हेही वाचा : Video : बाबा सिद्दीकींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सलमान खान पोहोचला; भाईजानचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

दरम्यान, अंकिता वालावलकर ( Ankita Walawalkar ) आणि कुणाल भगत आता येत्या काही महिन्यांमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा शो संपल्यावर ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली असून आपल्या कामावर देखील परतली आहे.

Story img Loader