Ankita Walawalkar : ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या अंकिता वालावलकरने यंदा Bigg Boss च्या पाचव्या सीझनमध्ये टॉप-५ पर्यंत मजल मारली. मात्र, या पर्वाच्या निमित्ताने अंकिताच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली ती म्हणजे लाडक्या लेकीला भेटण्यासाठी तिचे बाबा पहिल्यांदाच मुंबईत आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता वालावलकर मूळची कोकणातली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात देखील ती अनेकदा मालवणी भाषेत संवाद साधत होती. यंदाचा खेळ अंतिम टप्प्यात आलेला असताना घरात फॅमिली वीक टास्क पार पडला होता. यावेळी अंकिताचे बाबा पहिल्यांदाच आपल्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईत आले होते.

‘कोकण हार्टेड गर्ल’ २०१६ च्या आसपास आपलं करिअर घडवण्यासाठी कोकणातून मुंबईत आली. यानंतर अनेकदा आग्रह करून देखील तिचे बाबा कधीच मुंबईत आले नव्हते. मात्र, आपल्या लेकीला ‘बिग बॉस’च्या घरात भेटण्यासाठी अंकिताचे बाबा यंदा पहिल्यांदाच मुंबईत आले होते. मुंबईत आल्यावर ते फक्त एक दिवस राहिले त्यानंतर पुन्हा कोकणात परतले.

हेही वाचा : रितेश देशमुख व जिनिलीयाच्या दोन्ही मुलांनी ‘असा’ साजरा केला दसरा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

बाबा मुंबईत आल्यावर अंकिता ‘बिग बॉस’च्या घरात होती. त्यामुळे आपलं कौतुक करण्यासाठी आलेल्या वडिलांसाठी अंकिताने खास भावुक पोस्ट लिहिली आहे. अंकिता Bigg Boss च्या घरात असल्याने तिच्या बाबांचं स्वागत करण्यासाठी तिचा होणारा नवरा कुणाल भगत उपस्थित होता. याचा खास व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अंकिताने वडिलांसाठी शेअर केली खास पोस्ट

अंकिता यात म्हणते, “माझे बाबा मुंबईत आले तो क्षण पाहण्यासाठी मी त्यांच्याबरोबर नव्हते. पण, त्यांनी मुंबई थोडीफार…त्यांना एका दिवसात जेवढं जमलं तेवढी पाहिली. त्यानंतर ते ‘बिग बॉस’च्या घरात आले. खरंच हा क्षण मी आयुष्यात विसरू शकणार नाही. Bigg Boss मध्ये मला व्होट मिळावेत यासाठी बाबा स्वत: प्रयत्न करत होते ही माझ्यासाठी खरंच आश्चर्याची गोष्ट होती. स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या मुली कायम पहिल्या याव्यात म्हणून बाबांनी घेतलेला अभ्यास मला यानिमित्ताने आठवला. हे सगळं मी कधीच विसरू शकणार नाही. अर्थात तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे मी हे दिवस बघू शकतेय…त्यामुळे तुम्हा सर्वांचे देखील मनापासून आभार.”

हेही वाचा : Ankita Walawalkar – सूर जुळले…! म्हणत कोकण हार्टेड गर्लने अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा, नावही आलं समोर

दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत अंकिता वालावलकर ( Ankita Walawalkar ) व तिच्या कुटुंबीयांच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita walawalkar aka kokan hearted girl shares emotional post for father watch video sva 00