‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ( Suraj Chavan ) खूप प्रसिद्धीझोतात आला आहे. अनेकजण सूरजला भेटण्यासाठी त्याचं गाव गाठत आहेत. राजकीय मंडळींसह इतर कलाकार मंडळी सूरजची भेट घेताना दिसत आहेत. तसंच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्य देखील वेळात वेळ काढून सूरजची भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वी धनंजय पोवार, वैभव चव्हाण, इरिना आणि जान्हवी किल्लेकर सूरजला भेटण्यासाठी बारामतीमध्ये गेले होते. त्यानंतर अंकिता वालावलकर ( Ankita Walawalkar ) देखील होणाऱ्या नवऱ्याला (कुणाला भगत) घेऊन सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेली होती. याचा व्हिडीओ नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अंकिता वालावलकरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि तिचा नवरा सूरजसह गावकऱ्यांची देखील भेट घेताना दिसत आहेत. तसंच यावेळी अंकिता आणि कुणाल गावातल्या मुलांबरोबर खेळताना पाहायला मिळत आहेत. अंकिता आणि सूरजला पाहण्यासाठी मंदिरामध्ये गावकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचं दिसत आहे. या खास भेटीत अंकिताने सूरजला लग्नाची पत्रिका दिली आहे.
हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निखिल दामलेने खरेदी केली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
हा व्हिडीओ शेअर करत अंकिता वालावलकरने लिहिलं आहे, “सूरज चव्हाणचं गाव…’बिग बॉस’नंतर भेटायचं म्हटलं तर त्याच्याकडे होणाऱ्या गर्दीचा विचार करून मी आरामात भेटायचं ठरवलं खरं, पण त्याला वाटू लागलं की पॅडी दादा आणि अंकिता ताई येत का नाहीत…खरंतर माझ्या त्रासासाठी नाही, पण त्याला होणारा त्रास कमी होईल म्हणून उशीरा भेट घ्यायची होती…रोज असणारी फोटोसाठी प्रचंड गर्दी आणि महाराष्ट्राच प्रेम त्याच्यामागे असंच कायम राहूदे…आणि हो मी लग्नाचं आमंत्रण पण दिलं.”
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
हेही वाचा – Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित
अंकिता वालावलकरच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुम्ही कोकण हार्टेड गर्ल नाही तर महाराष्ट्र हार्टेड गर्ल आहात. तुम्हाला मानलं तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, तुम्हाला गरिबीची जाण आहे. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अंकिताताई तू खरंच कौतुकास्पद आहे.”