Ankita Walawalkar : ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले पार पडून आता दोन दिवस उलटले आहेत. तरीही यंदा घरात प्रवेश केलेल्या आणि विशेषत: शेवटच्या टॉप-५ स्पर्धकांची महाराष्ट्राच्या घराघरांत चर्चा होत आहे. अंकिता वालावलकर म्हणजे प्रेक्षकांची लाडकी ‘कोकण हार्टेड गर्ल’ या शोमुळे एवढी लोकप्रिय झाली की, आता अंकिता लग्न केव्हा करणार याची उत्सुकता तिच्या तमाम चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरात सहभागी झाल्यावर अंकिताने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. याशिवाय घरात अन्य सदस्यांशी संवाद साधताना अंकिताने तिचा होणारा नवरा संगीत दिग्दर्शक असल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे घराबाहेर आल्यावर सगळेजण अंकिताचा होणारा नवरा नेमका कोण आहे? याबद्दल तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मंगळवारी एक स्टोरी शेअर करत ‘कोकण हार्टेड गर्ल’ने होणाऱ्या नवऱ्याबद्दल १२ ऑक्टोबरला सांगेन असं जाहीर केलं होतं. आता ती खरंच नवऱ्याबद्दल केव्हा सांगणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच अंकिताच्या आणखी एका इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss ची ट्रॉफी घेऊन गावच्या शाळेत पोहोचला सूरज चव्हाण! म्हणाला, “बाळांनो शिक्षण घ्या, मी गरीब होतो पण…”

अंकिता वालावलकरला नवऱ्याने दिलं खास Surprise

अंकिताने शेअर केलेल्या स्टोरीला “केळवणाला सुरुवात…” असं कॅप्शन दिलं आहे. यात तिच्या हातात दोन कॉफी मग पाहायला मिळत आहेत. यावर ‘Better Together’ असं लिहिण्यात आलं आहे. तर, यापुढच्या स्टोरीमध्ये अंकिताच्या नवऱ्याने तिला ‘बिग बॉस’ संपल्यावर काय सरप्राइज दिलं हे पाहायला मिळत आहे.

अंकितासाठी भव्य सजावट करून मध्यभागी ‘Winner’ असं लिहिण्यात आलं होतं. पांढऱ्या-लाल रंगाचे फुगे, औक्षण, फुलांची सजावट, केक ही सगळी तयारी खास ‘कोकण हार्टेड बॉय’ने केली होती. याचा फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये ‘थँक्यू नवऱ्या’ असं लिहिलं आहे. याचबरोबर ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवासात एक भाऊ म्हणून अंकिताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तिचे डीपी दादा देखील तिच्या कायम संपर्कात राहणार असं अंकिताने पुढील पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

हेही वाचा : सूरजने ‘ते’ शब्द खरे ठरवले! Bigg Boss ची ट्रॉफी घेऊन आधी गेला जेजुरीला, नंतर बारामतीत जंगी स्वागत, पाहा व्हिडीओ

अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम स्टोरी ( Ankita Walawalkar )
अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने दिलं स्पेशल Surprise ( Ankita Walawalkar )

दरम्यान, अंकितावर ( Ankita Walawalkar ) संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. आता ही ‘कोकण हार्डेट गर्ल’ लग्नबंधनात केव्हा अडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita walawalkar future husband arrange special surprise for her after bigg boss sva 00