‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे घराघरांत पोहोचलेली सोशल मीडिया इन्फ्लूएंसर म्हणजे ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar). गेल्या काही दिवसांपासून अंकिता तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडल्यावर लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचं तिने जाहीर केलं होतं. यानुसार अंकिता व संगीत दिग्दर्शक कुणाल भगत (Kunal Bhagat) यांचा विवाहसोहळा १६ फेब्रुवारी रोजी थाटामाटात पार पडला.

संगीतकार कुणाल भगतबद्दल

अंकिताचा नवरा कुणाल भगत (Kunal Bhagat) हा लोकप्रिय संगीत दिग्दर्शक आहे. तो आणि करण सावंत हे दोघे मिळून मालिका, चित्रपट व अल्बम्ससाठी संगीत देतात. त्यांनी अनेक मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांना संगीत दिलं आहे. शिवाय काही मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. नुकत्याच आलेल्या ‘येक नंबर’ या चित्रपटांतील गाण्यांसाठी त्यांचे सर्वत्र कौतुक झालं. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असणारा कुणाल सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो.

कुणाल भगतचा चाहत्यांशी संवाद

सोशल मीडियावर कुणाल (Kunal Bhagat) फोटो व कामानिमित्तची माहिती शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर प्रश्नोत्तरांच्या सेगमेन्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याला त्याच्या रसिक श्रोत्यांनी अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नोत्तरांच्या सेगमेन्टमध्ये त्याला ‘बिग बॉस मराठी’मधीलच धनंजय पोवार (Dhananjay Powar) यांनीही एक खास प्रश्न विचारला ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

कुणाल भगत इन्स्टाग्राम स्टोरी
कुणाल भगत इन्स्टाग्राम स्टोरी

कुणाल भगत आणि डीपी दादा लवकरच एकत्र करणार काम

‘बिग बॉस’ फेम धनंजय पोवार (Dhananjay Powar) अर्थात डीपी दादा यांनी कुणालला त्यांच्या आगामी एकत्र कामाबद्दल विचारलं. इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेगमेन्टमध्ये “चल लवकर प्रोजेक्ट सुरू करूया” असं धनंजयने कुणालला विचारलं. त्यावर कुणालनेदेखील त्याला “लवकरच” असं उत्तर दिलं. कुणालच्या या उत्तरावरून धनंजय-कुणाल ही जोडी लवकरच कोणता तरी प्रोजेक्ट घेऊन येणार आहेत असं दिसत आहे.

कुणाल भगत व डीपी दादांच्या एकत्र प्रोजेक्टची उत्सुकता

अर्थात आता हा प्रोजेक्ट नेमका काय आहे? हे दोघे एकत्र नेमकं काय घेऊन येणार आहेत? आणि त्यांचा हा एकत्र प्रोजेक्ट नेमका कधी येणार? याबद्दल दोघांनी काहीही खुलासा केलेला नाही. पण कुणालच्या (Kunal Bhagat) “लवकरच” या उत्तरामुळे चाहते मंडळींना त्यांच्या एकत्र आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे हे नक्की…

कुणाल भगतबरोबर डीपी दादांचा खास बॉण्ड

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता-धनंजय यांचे भाऊ-बहिणीचे नाते पाहायला मिळाले. ‘बिग बॉस’नंतरही त्यांनी आपले नाते जपले. अंकिताबरोबरच (Kunal Bhagat) धनंजयचा कुणालबरोबरही खास बॉण्ड आहे. नुकतीच धनंजयने अंकिता-कुणालच्या लग्नात हजेरी लावली होती आणि त्यांनी लग्नात धमाल मजामस्तीही केली. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Story img Loader