Ankita Walawalkar : ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून घराघरांत लोकप्रिय झालेली अंकिता वालावलकर यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाली होती. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शोमध्ये देखील आपल्या सरळ-साध्या आणि स्पष्टवक्तेपणाच्या स्वभावामुळे अंकिताने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. घरात प्रवेश घेतल्यावर लवकरच लग्न करणार तिने सांगितलं होतं.
‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेनंतर अंकिताचा ( Ankita Walawalkar ) होणारा नवरा कोण आहे याची सर्वत्र चर्चा रंगू लागली. अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणारा नवरा मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत असल्याचं तिने पोस्ट शेअर करत जाहीर केलं. ‘बिग बॉस’च्या घरात शेवटच्या आठवड्यात अंकिता अन् अभिजीतचे खूप वाद झाले होते. अगदी घराबाहेर आल्यावर पुन्हा अंकिताशी मैत्री करणार नाही असंही अभिजीतने सांगितलं होतं. या सगळ्यावर आता एका इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून अंकिताने अप्रत्यक्षपणे भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
अंकिता आणि महेश मांजरेकरांची भेट
अंकिता ( Ankita Walawalkar ) व तिचा होणारा नवरा कुणाल या दोघांनी जोडीने ‘पाणी’ या मराठी चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थिती लावली होती. यावेळी तिने मराठी ‘बिग बॉस’चे आधीचे चार पर्व होस्ट केलेले ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची भेट घेतली. अंकिता व कुणालने जोडीने मिळून यावेळी महेश मांजरेकरांचे आशीर्वाद घेतले. याचा खास व्हिडीओ अंकिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अंकिता व महेश मांजरेकर यांच्यात यावेळी ‘बिग बॉस’च्या गप्पा रंगल्याची शक्यता आहे. कारण, आर्या जाधव सुद्धा नंतर या तिघांबरोबर गप्पा मारण्यासाठी सहभागी झाली होती. तसेच अंकिताने या व्हिडीओला “अखेर मला माझं उत्तर मिळालं, मी बरोबर होते” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा : सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”
दरम्यान, अंकिताच्या ( Ankita Walawalkar ) वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या आत सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी मिळेल असं तिने अनेक मुलाखतींदरम्यान सांगितलं आहे.