Bigg Boss Marathi Fame Ankita Walawalkar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे अंकिता वालावलकर घराघरांत लोकप्रिय झाली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली ही ‘कोकण हार्टेड गर्ल’ Bigg Bos शोपासून सर्वत्र ‘महाराष्ट्र हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाते. अंकिताचा स्पष्टवक्तेपणा, शोमधला तिचा खरेपणा प्रत्येकाला भावला. तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. ‘बिग बॉस’च्या घरात असतानाच तिने लवकर लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता वालावलकरचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सर्वांना सांगितलं. अंकिताचा नवरा लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक असून त्याचं नाव कुणाल भगत असं आहे.

हेही वाचा : “गूड बाय यश अरुंधती देशमुख…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने लिहिली भलीमोठी भावुक पोस्ट, म्हणाला, “निरोप घेताना…”

अंकिता ( Ankita Walawalkar ) आणि कुणाल आता लवकरच लग्न करणार आहेत. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यावर येत्या फेब्रुवारी महिन्याच्या आधी लग्न करणार असं तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र, अंकिताने अद्याप तिच्या लग्नाची तारीख कोणालाही सांगितलेली नाही. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ‘कोकण हार्टेड गर्ल’ लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये “प्री-वेडिंग शूट करणं गरजेचं आहे का?” असा प्रश्न तिने चाहत्यांना विचारला आहे. अलीकडच्या काळात लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे.

हेही वाचा : “राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला असला तरी…”, शशांक केतकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, अभिनेत्याने अधिकृत भारतीय जनतेचा जाहीरनामा केला शेअर

हेही वाचा : शाहरुख आणि सलमानच्या ‘त्या’ प्रँकमुळे घाबरले होते सेटवरचे लोक; ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या सेटवर काय घडलेलं? दिग्दर्शक म्हणाले…

अंकिताचं ( Ankita Walawalkar ) कॅप्शन वाचून नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “प्री-वेडिंग शूट…येस शास्त्र असतं ते केलंच पाहिजे”, “आठवलं का आईचं वाक्य पुढच्या दत्त जयंतीच्या आत लगीन होऊक व्हया”, “क्यूट जोडी”, “Big येस…ते फोटो कायम तुमच्याजवळ राहतील”, “तुम्हा दोघांना कोणाची नजर लागू नये… नक्की फोटोशूट करा” अशा प्रतिक्रिया ‘कोकण हार्टेड गर्ल’चं कॅप्शन वाचून नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita walawalkar shares with fiance and gave unique caption to photo sva 00