Ankita Walawalkar : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून अंकिता वालावलकर घराघरांत लोकप्रिय आहे. सगळे तिला ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखतात. पण, यंदा ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाल्यामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली. शोमध्ये अंकिताचा खरेपणा, स्पष्टवक्तेपणा तिच्या चाहत्यांना भावला. वैयक्तिक आयुष्यात अंकिता लवकरच लग्न करणार असल्याचं सर्वांनाच माहिती आहे. पण, आता या ‘कोकण हार्टेड गर्ल’ने तिच्या सर्व चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता वालावलकरने ( Ankita Walawalkar ) एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेसाठी तिने प्रोमो गीत लिहिलं असल्याची माहिती नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या २३ डिसेंबरपासून एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘लक्ष्मी निवास’. या कौटुंबिक मालिकेची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. याच बहुचर्चित मालिकेसाठी अंकिताला प्रोमो गीत लिहिण्याची संधी मिळाली.

हेही वाचा : Pushpa 2 चा बॉक्स ऑफिसवर जलवा, ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, एका आठवड्यात कमावले तब्बल…

अंकिता सांगते, “झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका तुमच्या भेटीला येतेय. या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास. यासाठी मी गाणं लिहिलंय… मी लिहिलेलं हे पहिलं गाणं हर्षवर्धन वावरे याने गायलं आहे आणि कुणाल-करण यांनी हे गाणं कंपोझ केलंय. लहानपणापासून मला गाण्याची आवड होती आणि या प्रोमोच्या निमित्ताने मी ( Ankita Walawalkar ) याची सुरुवात केलेली आहे.”

अंकिताने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या प्रोमोसाठी लिहिलेलं गाणं

स्वप्न सारे पाहिले
घर आनंदाचे
आधार नात्यांना भासतो

दुःख भारी वाटते
स्वप्न थोडे अडखळते
वेळ संयमाची वाटते

घर हे दिसती चार भिंती जणू
पण ही भावनांची कुस वीणू

सावरु
स्वप्न पुन्हा पाहण्या
सुखाची या
गोष्ट पुन्हा लिहिण्या

बंध ते जे सुख बोलती
मखमली स्वप्नांचे लक्ष्मी निवास ते

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने बायकोला दिलं ‘हे’ खास गिफ्ट, तर बायकोने रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं…

हेही वाचा : ‘पारू’मध्ये आला नवा प्रेमवीर! ‘मुशाफिरी’ फेम लोकप्रिय अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो

अंकिताच्या ( Ankita Walawalkar ) या पहिल्याच गाण्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. याशिवाय ‘लक्ष्मी निवास’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांच्या मध्यवर्ती भूमिका असणार आहेत. ही मालिका २३ डिसेंबरपासून रात्री ८ वाजता प्रसारित केली जाणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita walawalkar writes promo song for zee marathi new serial lakshmi niwas sva 00