अंकुश चौधरी हा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘दगडी चाळ’, ‘डबलसीट’, ‘मातीच्या चुली’, ‘जत्रा’, ‘सावरखेड एक गाव’, ‘दुनियादारी’ अशा सुपरहिट चित्रपटांतून काम करुन अंकुशने अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या अंकुश स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या रिएलिटी शोचे परिक्षण करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या शोच्या रविवारी(१६ एप्रिल) प्रसारित झालेल्या भागात चिमुकल्या प्रशमेशने अंकुश चौधरीसाठी खास पर्फोरमन्स सादर केला. प्रथमेशने अंकुशचा जीवनप्रवास त्याच्या नृत्यातून साकारला. दुनियादारी या अंकुशच्या सुपरहिट चित्रपटातील ‘टिक टिक वाजते डोक्यात’ या लोकप्रिय गाण्यावर प्रथमेशने डान्स सादर केला.

हेही वाचा>> Video : काँग्रेस आमदाराच्या पार्टीत कोल्हापुरी घालून पोहोचला एमसी स्टॅन, नेटकरी म्हणाले, “८० हजारांचे शूज…”

अंकुश चौधरीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना प्रथमेशने त्याच्या नृत्यातून दाखवण्यात आल्या. चिमुकल्या प्रथमेशचा हा डान्स पाहून अंकुश भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अंकुशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेशचा डान्स पाहून अंकुशचे डोळे पाणावल्याचे दिसत आहे.

हेही वाचा>> “माझं न्यूड फोटोशूट पाहून मित्राने फोन केला अन्…”, वनिता खरातने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तो फोटो फ्रेम करून…”

दरम्यान, कॉलेज जीवनापासून अभिनयाची सुरुवात केलेल्या अंकुशने मालिकांमध्येही काम केलं आहे. अंकुश ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush chaudhari gets emotional after seen dance performance of child dancer in me honar superstar video kak