‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच दोन नव्या मालिका सुरू होत आहेत. ‘घराघरो मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ या दोन नव्या मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकही नव्या मालिकांविषयी उत्सुक आहेत. अशातच ‘स्टार प्रवाह’वर नवा रिअ‍ॅलिटी शो देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा पहिला-वहिला प्रोमो नुकताच समोर आला आहे.

‘स्टार प्रवाह’वर सध्या अभिनेता सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालन करत असलेला ‘आता होऊ दे धिंगाणा २’ रिअ‍ॅलिटी शो सुरू आहे. या शोमध्ये दोन मालिकांच्या टीममधली सांगीतिक लढत पाहायला मिळत आहे. पण लवकरच सिद्धार्थचा धिंगाणा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा २’ ची जागा ‘मी होणार सुपरस्टार – जोडी नंबर १’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो येणार आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

हेही वाचा – Premachi Goshta: “चांदीच्या ताटात म्हावऱ्याचं तुकडं…”, मुक्ताने सागरसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

‘मी होणार सुपरस्टार – जोडी नंबर १’ या नव्या रिअ‍ॅलिटी शोमधून चमचमीत आणि झणझणीत डान्सच्या जोड्या घेऊन अभिनेता अंकुश चौधरी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. याआधी ‘मी होणार सुपरस्टार – जल्लोष ज्युनियर्सचा’ हा शो चांगलाच गाजला होता. त्यामुळे आता ९ मार्चपासून दर शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता ‘मी होणार सुपरस्टार – जोडी नंबर १’ हा शो सुरू होतं आहे. याचा पहिला-वहिला प्रोमो ‘मराठी टीव्ही इन्फो ऑफिशिअल’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “आज लक्ष्या असता तर…”, वर्षा उसगांवकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींना उजाळा देत व्यक्त केली ‘ही’ खंत, म्हणाल्या…

दरम्यान, ‘मी होणार सुपरस्टार – जोडी नंबर १’ या नव्याकोऱ्या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून जुळे भाऊ, बाप-लेक, बहिणी-बहिणी अशा जोड्यांचा धमाकेदार डान्स पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये आता अंकुश चौधरीसह परीक्षकाच्या भूमिकेत कोण-कोण असणार? हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

Story img Loader