मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दीपा परब हीसुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहे. दीपा सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत दीपा मुख्य भूमिकेत असून अश्विनी हे पात्र साकारत आहे. ‘तू चाल पुढं’ मालिकेतील भूमिकेमुळे तिला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दीपाने नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला सेलिब्रिटी क्रशबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “तुझा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण होता?” असा प्रश्न दीपाला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना दिपाने मास्टर ब्लास्टरचं नाव घेतलं. “सचिन तेंडुलकर माझा पहिला क्रश होता,” असं दीपा म्हणाली.

हेही वाचा>> शरद पवारांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’, प्रतिक्रिया देत म्हणाले, “अंकुश चौधरी…”

“पहिलं प्रपोज कोणाला केलं होतं?” असा प्रश्नही दीपाला या मुलाखतीत विचारला गेला. यावर तिने “मला सचिन तेंडुलकरला प्रपोज करायचं होतं,” असं उत्तर दिलं. पुढे ती म्हणाली, “मी कुणाला प्रपोज करण्याच्या आधीच अंकुशने मला प्रपोज केलं होतं. त्यामुळे मी ज्या माणसावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न केलं.”

हेही वाचा>> रितेश देशमुखचा ‘वेड’ पाहून विवेक ओबेरॉय भारावला, पोस्ट शेअर करत म्हणाला…

अंकुश व दीपाने १० ते १२ वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दिपा व अंकुश यांना प्रिन्स हा मुलगा आहे. मुलगा झाल्यानंतर दीपाने काही काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा ‘तू चाल पुढं’ मालिकेतून दीपा करिअरकडे वळली आहे.