विनोदाचं अचूक टायमिंग साधत अभिनेता अंशुमन विचारेने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांमुळे अभिनेता घराघरांत लोकप्रिय झाला. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याचे पत्नी व मुलीबरोबरचे अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असतात.
अंशुमनने नुकतीच कुटुंबाबरोबर ‘लोकमत फिल्मी’च्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम का सोडला यावर भाष्य केलं आहे. अभिनेता म्हणाला, “हास्यजत्रेत मी काम करत होतो त्यानंतर २०१९-२० च्या दरम्यान सगळीकडे करोनाची लाट आली. करोना संक्रमणामुळे सर्वत्र बबल शूट करायला सुरुवात झाली.”
अंशुमन पुढे म्हणाला, “माझी मुलगी तेव्हा १ ते २ वर्षांची असेल. खरं सांगायचं झालं, तर मी तेव्हा फार कंटाळलो होतो. एखादी गोष्ट एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचली की, थांबायचं ही माझी सवय आहे. मला नेहमी काही ना काही क्रिएटिव्ह करायला आवडतं. जेव्हा नवीन काही होत नाही तेव्हा थांबावं या मताचा मी आहे. घरी मी बायकोला सांगितलं, सुरुवातीला ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ केलं, त्यानंतर ‘फू बाई फू’, मग ‘बुलेट ट्रेन’ केलं आता हास्यजत्रा मला आता तेच तेच करून कंटाळा आलाय.”
हेही वाचा : १२०० ची साडी, २०० रुपयांचे कानातले अन्…; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितली लग्नाची गोष्ट, म्हणाली…
“अभिनेता म्हणून माझी प्रगती होत नाहीये. त्यामुळे मी थोडावेळा थांबतो असा निर्णय मी माझ्या बायकोला सांगितला. तेव्हा ती म्हणाली चालेल…आपण सगळं सांभाळून संसार करू, आमटी-भात खाऊन राहू. तिचं हे सहकार्य करणं, घरची साथ ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. हास्यजत्रा सोडल्यावर करोना काळात मी जवळपास १ वर्ष काहीच काम करत नव्हतं. तरीही मला घरून खूप आधार मिळाला.” असं अंशुमनने सांगितलं.