स्टार प्लस या वाहिनीवर प्रसारित होणारी ‘अनुपमा’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या लोकप्रिय मालिकेमध्ये रुपाली गांगुली यांनी अनुपमा शहा हे प्रमुख पात्र साकारले आहे. मध्यंतरी त्या काही काळ मनोरंजन विश्वापासून लांब राहिल्या होत्या. या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले. सध्या त्यांच्या मुलामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आपल्या मुलाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
रुपाली गांगुलीने आपल्या मुलाचे फोटो शेअर केले आणि त्याचे अभिनंदन केले, ती पोस्टमध्ये लिहले, “मला खूप अभिमान आहे थु थु थू, शोतोकन कराटे स्पर्धेत त्याने तीनही स्पर्धांमध्ये तीन पदके जिंकली. इतकंच नव्हे तर पोटात दुखत असताना आम्ही त्याला रुग्णालयात नेट होतो मात्र त्याने नकार दिला. आणि त्याने या स्पर्धेत भाग घेतला. या छोट्या लढवय्याला पाठिंबा देण्यासाठी आमचे संपूर्ण कुटुंब हजर होते. रिधेशने आम्हाला खूप काही शिकवले. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.”
रुपाली या छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहेत. रुपाली यांचे लाखो चाहते आहेत. मालिकेत रुपाली अशा महिलेची भूमिका साकारत आहे जी तिच्या कुटुंबासाठी अनेक गोष्टींचा त्याग करते, कारण तिला एक चांगली आई आणि पत्नी बनायचे असते. याआधी त्यांनी साराभाई Vs साराभाई, संजीवनी, बा बहू और बेबी या मालिकांमध्ये काम केले आहे.