स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. अनुपमा मालिकेतील कलाकरांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका रंजक वळणावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनराजने विश्वासघात केल्यानंतर अनुपमाने अनुजशी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरवात केली. त्यानंतर त्यांच्या नात्याने अनेक वळण पाहिल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं होतं. अनुपमा व अनुजचं नातं खुलत गेल्याचं पाहायला मिळालं. आता अनुपमा व अनुज रोमॅंटिक होत एकमेकांच्या जवळ आल्याचं मालिकेच्या येणाऱ्या भागात दिसणार आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हुकल्यानंतर अमृता धोंगडेची पोस्ट, म्हणाली “आता प्रत्यक्षात…”

हेही वाचा>>Bigg Boss 16: साजिदला पाहताच फराह खान भावूक; शिव ठाकरेला मिठी मारत म्हणाली “तू माझा…”

अनुपमा व अनुजचा ऑन स्क्रीन रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या रोमान्स करतानाच्या काही व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये अनुज व अनुपमा इंटिमेट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनुज अनुपमाला किस करतानाही व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा>>“ट्रॉफी वगैरे सगळं…”, ‘बिग बॉस’ फेम आरोह वेलणकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अनुपमाने अनुजसाठी डिनर डेट प्लॅन केल्याचं मालिकेत दाखविण्यात आलं आहे. या डिनर डेटदरम्यान ते दोघेही एकमेकांच्या जवळ येणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मालिकेत रंजक वळण आल्याचं पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupama and anuj on screen romace kissing video goes viral kak