‘अनुपमा’ या मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली गांगुली घराघरांत लोकप्रिय झाली आहे. ‘अनुपमा’ हा ‘आई कुठे काय करते’ या मराठी मालिकेचा हिंदी रिमेक आहे. हिंदी मालिकेत ‘अनुपमा’ची मुख्य व्यक्तिरेखा अभिनेत्री रुपाली गांगुली साकारत आहे. गेली १५ ते २० वर्ष रुपालीने छोट्या पडद्यावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री फिल्ममेकर अनिल गांगुली यांची मुलगी आहे. घरातूनच अभिनय क्षेत्राचा वारसा लाभला असला, तरी रुपालीला इंडस्ट्रीमध्ये अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. सुरूवातीच्या काळात तिला कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचा धक्कादायक खुलासा रुपालीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
हेही वाचा : “लग्नाचं योग्य वय कोणतं?”, मुग्धा-प्रथमेशचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; स्वत:चं मत मांडत म्हणाले, “आपली जनरेशन…”
चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन यामध्ये होणाऱ्या भेदभावाविषयी रुपालीला पिंकव्हिलाच्या मुलाखतीत विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, “मी जेव्हा अभिनय क्षेत्रामधील माझा प्रवास सुरू केला तेव्हा कास्टिंग काउच हा प्रकार इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होता. कास्टिंग काऊचचा अनेक मुलींना सामना करावा लागला. अर्थात सगळ्यांनाच असा अनुभव आला असेल असं नाही पण, मला कास्टिंग काऊचचा सामना केल्यावर मी चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.”
हेही वाचा : सनी देओल शाहरुख खानशी १६ वर्षे का बोलत नव्हता? ‘डर’ सिनेमाच्या सेटवर घडलेला ‘तो’ किस्सा काय?
रुपाली गांगुली पुढे म्हणाली, “माझ्या घरात अभिनयाचा वारसा असूनही मी छोट्या पडद्यावर काम करण्याचा निर्णय घेतल्याने माझे अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईक माझ्याकडे फ्लॉफ अभिनेत्री म्हणून पाहायचे. त्याकाळात टेलिव्हिजनला अतिशय कमी लेखलं जायचं. पण, आता दिवस बदलले आहे. ‘अनुपमा’मुळे मी घराघरांत पोहोचले आणि मला एक वेगळी ओळख मिळाली आहे. आता मला स्वत:चा प्रचंड अभिमान वाटतो.”
हेही वाचा : ठरलं तर मग : प्रेमाच्या दिशेने अर्जुनचं पहिलं पाऊल, तर सायलीच्या मनात परकेपणाची भावना; मालिकेत येणार नवं वळण
दरम्यान, रुपालीने २००० साली एका मालिकेत संजीवनी नावाची खलनायिका साकारली होती. या मालिकेमुळे तिची लोकप्रियता वाढली. पुढे, अभिनेत्री ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत झळकली. परंतु, २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुपमा’ या मालिकेमुळे रुपालीचं नशीब उजळलं. या मालिकेने नुकतेच १ हजार भाग पूर्ण केले आहेत.