‘बिग बॉसचं १७’वं पर्व संपून एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेला आहे. पण या पर्वातील प्रत्येक स्पर्धकांची चर्चा अजूनही होतं आहे. अशात ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकीला अनुराग डोभालने ओपन चॅलेंज दिलं आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘बिग बॉस १७’मध्ये मुनव्वरसह अनुराग डोभालने देखील सहभाग घेतला होता. पण दोघांचं ‘बिग बॉस’च्या घरात कधी जमलंच नाही. सतत दोघं भांडताना दिसले आणि आता ‘बिग बॉस’च्या घराबाहेरही हेच चित्र पाहायला मिळत आहे. मुनव्वर व अनुरागचे चाहते सतत सोशल मीडियावर एकमेकांविरोधात बोलत असतात. ‘बिग बॉस’ संपलं असलं तरी दोघांचं शत्रूत्व अजून कायम आहेत. आता थेट अनुरागने मुनव्वरला ओपन चॅलेंज दिलं आहे. पण का? हे जाणून घ्या…
काही दिवसांपूर्वी एका क्रिकेट सामन्यात मुनव्वर व ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादव एकत्र खेळताना दिसले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत मुनव्वरच्या चाहत्यांनी अनुरागला ट्रोल केलं. मुनव्वर व एल्विशचे फोटोवरून अनुरागची खिल्ली उडवली. याच पार्श्वभूमीवरून आता अनुरागने मुनव्वरला ओपन चॅलेंज दिलं आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत अनुराग डोभाल म्हणाला, “मी आता सोशल मीडिया पाहत होतो. तर एल्विश यादवचं प्रकरण आता खूप मोठं झालं आहे. जे काही झालं ते झालं. पण मला बरेच लोक ट्विटरवर मुनव्वरची स्टोरी टॅग करत होते. घरी बसून पॉपकॉन खातोय वगैरे. भाई, मी आता तुला थेट टॅग करून स्टोरी पोस्ट करतोय, जर तुझ्यात हिंमत असेल तर हे ऑनलाइन गँगस्टर बनणं, ऑनलाइन ट्रोल करणं सोडून दे. मी तुला बॉक्सिंग फाइटसाठी चॅलेंज करतो. जर तुझ्यात खरंच हिंमत असेल तर फेक गँगस्टर, फेक ट्रोर्लिंग बंद कर आणि मला भेट. तिथे मी तुला दाखवतो सिस्टम काय असते…”
हेही वाचा – Video: राधिका मर्चंटने हॉलीवूड चित्रपटातील संवाद केले कॉपी! नेटकरी म्हणाले, “आता हिला आरामात…”
दरम्यान, याआधी अनुराग डोभालने ‘बिग बॉस १७’ व सलमान खान विरोधात विधानं केली होती. त्यामुळे सलमान खानने ‘बिग बॉस १७’च्या महाअंतिम सोहळ्यात त्याची खिल्ली उडवली होती.