Aditi Sharma On Abhineet Kaushik: ‘अपोलिना’ फेम टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अवघ्या चार महिन्यात अदिती शर्मा घटस्फोट मागत असल्याचा दावा तिचा पती अभिनीत कौशिकने केला आहे. तसेच करिअरमुळे तिने लग्न लपवून ठेवायला सांगितलं, असं म्हणत अभिनीतने पत्नीवर फसवणुकीचा आरोप केला. आदिती तिचा सहकलाकार सामर्थ्य गुप्ताबरोबर तिचं अफेअर आहे, असा दावाही अभिनीतने केला आहे. अखेर अदितीने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. अभिनितच्या दाव्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.
आदिती शर्माने इंडिया फोरमशी बोलताना म्हणाली, “मी कोणत्याही पुरुषाकडे पाहिलं किंवा त्यांच्याशी बोलले तर अभिनीत मला वेगवेगळी नावं ठेवतो. मी एखाद्या मुलाशी बोलले तरी अभिनीतला आवड नाही. मी चॅटमध्ये हार्ट इमोजी वापरलेलाही त्याला आवडत नाही.”
अदितीने सांगितलं नात्यात समस्या येऊ लागल्यानंतर ती समुपदेशकाकडे गेली होती. अभिनीतच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे, त्यामुळे तिने दुर्लक्ष करावं असं त्यांनी सुचवलं. २०२५ सुरू आहे आणि एक महिला असली तरी तिला तिचे सहकलाकार आणि पुरुषांशी भेटण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. ती मर्यादा ओलांडण्याचा किंवा फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत नव्हती, असंही अदितीने म्हटलंय.
अभिनीत कौशिकच्या दाव्यांबद्दल अदिती काय म्हणाली?
अदितीने अभिनीतच्या दाव्यांवर म्हणाली की कोणताही पुरुष कधीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणार नाही किंवा तिच्याकडे बोट दाखवणार नाही. अभिनीतने असे आरोप करून वाईट वागणूक दिली, यावरून तो कसा माणूस आहे आणि त्याचे विचार कसे आहेत हे स्पष्ट होतं, असं अदिती म्हणाली. अभिनीतमुळे मित्र आणि कुटुंबापासून हळूहळू दुरावत असल्याचं अदितीने सांगितलं.
४ महिन्यांपूर्वी केलं लग्न
अभिनीत कौशिकने इंडिया फोरमशी बोलताना त्याच्या आणि अदितीच्या लग्नाबद्दल खुलासा केला. दोघांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईतील गोरेगाव येथे त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. दोघांनीही आपलं लग्न गुपित ठेवलं होतं. अदितीने तिच्या करिअरमुळे हे लग्न लपवून ठेवण्यास सांगितलं होतं, कारण लग्नामुळे इंडस्ट्रीत काम मिळणार नाही, असं तिला वाटत होतं; असा दावा अभिनीतने केला होता.