‘अप्पी आमची कलेक्टर'(Appi Aamchi Collector) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. या मालिकेतील अप्पी, अर्जुनपासून अगदी छोटा अमोलपर्यंत सगळी पात्रे प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसतात. त्यांच्या कुटुंबातील एकोपा व सध्या अमोलभोवती घरातील सर्वांचे असणारे जग, यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची मालिकेतील उत्सुकता टिकून राहत असल्याचे पाहायला मिळते. आता मात्र अप्पी व अमोल यांच्या एका रीलने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अमोलने शेअर केला अप्पी माँ बरोबरचा व्हिडीओ
‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अमोल व या मालिकेत त्याच्या आईची भूमिका निभावत असलेली अप्पी यांची एक रील सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मालिकेतील अमोल म्हणजे साईराज केंद्रेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अप्पी व अमोल प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. संजू राठोडच्या ‘बुलेटवाली’ या गाण्यावर दोघांनी अभिनय केल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना साईराज केंद्रेने “प्रवास, मी आणि माझी अप्पी माँ”, असे म्हटले आहे. आता अप्पी व अमोलच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.
साईराज केंद्रेने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “बाळा खूप मोठा हो, तुझा खूप अभिमान आहे”, दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “बापरे, एवढा मोठा रॅप पाठ केला, खरंच खूप स्मार्ट क्युट बॉय आहे”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “खूप छान अभिनय. अजून लहान आहेस, मोठा झाल्यावर जग जिंकण्यासाठी प्रयत्न कर.” एका नेटकऱ्याने म्हटले, “अमोल बाळा, खूप खूप छान. तुझं मला खूपच कौतुक वाटते.” तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.
साईराज केंद्रे मालिकेतील त्याच्या अमोल या भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसतो. त्याच्या अभिनयासाठी त्याचे सातत्याने कौतुक होताना दिसते. याबरोबरच अनेक व्हिडीओच्या माध्यमातून त्याचे व मालिकेतील त्याच्या अप्पी माँचे बॉण्डिंगदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळते.
हेही वाचा: अभिनेत्रीसाठी चाहतीने केली ‘ही’ गोष्ट; पोस्ट शेअर करत म्हणाली, “अतिशय महत्त्वाचा क्षण…”
दरम्यान, साईराज हा रील्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असतो. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यातून साईराज घराघरांत पोहोचल्याचे पाहायला मिळाले होते.