चित्रपट, मालिका किंवा नाटक यामध्ये त्यातील सर्व पात्रांचे सारखे योगदान असते. प्रत्येक पात्राला तितकेच महत्व असते. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘अप्पी आमची कलेक्टर'(Appi Aamchi Collector) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. अप्पी आणि अर्जून यांच्यामधली प्रेम, मैत्री, भांडण, गैरसमज या सगळ्यामुळे प्रेक्षकांना पुढील भागात काय होईल याची कायम उत्सुकता लागलेली असते. मात्र, या सगळ्याबरोबर या मालिकेतील सर्वात लहान असलेला अमोल सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्याच्या अभिनयामुळे तर तो प्रेक्षकांना आवडतोच पण याबरोबरच त्याच्या आई वडिलांनी एकत्र राहावं आणि त्यांच्यात प्रेम कायम टिकावं यासाठीदेखील तो प्रयत्न करताना दिसतो.
आता झी मराठी वाहिनीने ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये अमोल त्याच्या आई वडिलांची लव्हस्टोरी बघायला मिळणार असल्याचे म्हणताना दिसत आहे.
लाडक्या लेकासाठी अप्पी अन् अर्जुन काय करणार?
व्हिडीओच्या सुरुवातीला, अर्जून, अमोल आणि अप्पी गावात गेले असून अमोल म्हणतो, “माझ्या माँ आणि बाबाची लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे.” त्यानंतर अप्पी आणि अर्जून यांच्या भूतकाळातील काही क्षण दिसत आहेत. जिथे अर्जुन शहेनशहा बनून अप्पीची मदत करत होता. अप्पी एका झाडाखाली येते. तेव्हा झाडामध्ये लपलेला अर्जून विचारतो, काही मदत पाहिजे का? हॉटस्पॉट पाहिजे का? त्यावर अप्पी म्हणते, “हॉटस्पॉटचं नाव काय आहे?” अर्जून म्हणतो, “शेहनशाहा.”
या व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की अप्पी आणि अर्जून एका घरासमोर आहेत. अप्पी अमोलला सांगते, “अमोल इथे तुझ्या बाबांनी मला वाचवलं होतं.” अर्जून म्हणतो, “माँ आणि बाबाची पहिली भेट होती.” त्यानंतर अर्जून आणि अप्पी दोघेही तयार होऊन आले आहेत. अर्जून म्हणतो, “त्या दिवसानंतर हे आयुष्य काढणं शक्यच नव्हतं. हा अरज्या अप्पी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही.” त्यानंतर अर्जून आणि अप्पी एकमेकांना आय लव्ह यू असे म्हणताना दिसत आहेत. अमोलसाठी अप्पी आणि अर्जून भूतकाळातील काही क्षण पुन्हा जगणार आहेत.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, अमोल पाहणार त्याच्या “माँ आणि बाबाची लव्हस्टोरी…!”, अशी कॅप्शन दिली आहे.
हेही वाचा: रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांचा ‘वैट्टेयन’ चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आणि कुठे? घ्या जाणून…
आता मालिकेत पुढे काय घडणार? अमोलच्या आई-वडिलांमध्ये कायम असेच प्रेम राहणार का? मालिकेत पुढे कोणते नवे वळण येणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.