झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मन जिंकतेय. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अप्पी म्हणजेच शिवानी नाईकची प्रेक्षकांना भुरळ पडलीय. आपल्या अभिनयानं अप्पीनं सगळ्यांचीच मनं जिंकलीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आज २१ जून रोजी सर्वत्र वटपौर्णिमा साजरी केली जातेय. अप्पीनेदेखील अर्जुनसाठी वटपौर्णिमा साजरी केली आहे आणि त्याचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा… ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या भविष्यात ४० वर्षे सलग घडणार ‘ही’ गोष्ट, अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

शिवानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. आज २१ जून रोजी सर्वत्र वटपौर्णिमा साजरी केली जातेय. अप्पीनंदेखील अर्जुनसाठी वटपौर्णिमा साजरी केली आहे आणि त्याचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अप्पीनं जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. सोनेरी रंगाच्या बुट्ट्यांची डिझाईन असलेली ही साडी अप्पीवर खुलून दिसतेय. तसेच अप्पीनं ठुशी, हार व मंगळसूत्र परिधान केलंय आणि हिरव्या बांगड्या, नथ व झुमके परिधान करीत तिनं हा खास वटपौर्णिमा लूक तयार केला आहे. ‘वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा’, असं कॅप्शन शिवानीनं या फोटोला दिलं आहे.

अप्पीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटो व्हायरल होताच अभिनेत्रीच्या चाहत्यांनी त्यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलं, “अप्पी खूप सुंदर दिसतेयस.” दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “अप्पी खूप सुंदर दिसतेय.” आणखी एकानं कमेंट करीत लिहिलं, अप्रतिम सौंदर्य. तर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर करीत अप्पीचं कौतुक केलंय.

हेही वाचा… ‘बिग बॉस-ओटीटी-३’ची प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी होणार शोचा पहिला भाग प्रदर्शित; जाणून घ्या कधी, कुठे व कसा पाहाल

‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. अर्जुनला सिंबा म्हणजेच अमोल हा त्याचा मुलगा आहे हे कळलंय. आता अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी अमोल काय करील याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत.

हेही वाचा… २०१७ मध्ये केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल शाहिद कपूरच्या पत्नीला येतात अजूनही हेट कमेंट्स, मीरा राजपूत म्हणाली, “आपण चुका करतो आणि…”

दरम्यान, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत शिवानी नाईक अप्पीची प्रमुख भूमिका साकारतेय; तर रोहित परशुराम अर्जुनची भूमिका साकारतोय. साईराज अप्पी आणि अर्जुनच्या मुलाचं सिंबा (अमोल) हे पात्र साकारतोय. या मालिकेत नीलम वाडेकर, श्रीकांत कांता ठाकोरभाई, संतोष पाटील, सुनील डोंगर अशा अनेक कलाकारांच्याही निर्णायक भूमिका आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appi amchi collector fame aparna eka shivani naik shared vat poornima photos on social media dvr