झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका अगदी कमी वेळातच प्रसिद्ध झाली आणि अप्पी हे पात्र घराघरांत पोहोचलं. अप्पी आणि अर्जुनची जोडीदेखील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या रीलमुळे प्रसिद्ध झालेला बालकलाकार साईराज केंद्रे म्हणजेच सिंबाची या मालिकेत एंट्री झालीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंबा आल्यानंतर या मालिकेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आलाय. ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. माँ आणि सिंबाचं ऑन स्क्रिन बॉन्डिंग जसं घट्ट आहे, तसंच ऑफस्क्रिन साईराज आणि शिवानीचं नातं आहे. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर रिल्स शेअर करत असतात. नुकताच सिंबा आणि अप्पीने पुष्पा-२ च्या व्हायरल गाण्यावर डान्स केला आहे.

हेही वाचा… “आपला लक्ष्या गेला रे…”, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाबद्दल महेश कोठारे झाले व्यक्त, म्हणाले…

सध्या पुष्पा-२ च्या ‘सूसेकी’ गाण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. इन्फ्लुएंसर्ससह अनेक कलाकारही या गाण्यावर थिरकताना दिसतायत. नुकताच सिंबानेदेखील या गाण्यावर डान्स केला होता. आता सिंबाने त्याच्या माँबरोबर हा ट्रेंड अगदी हटके अंदाजात केला आहे. या व्हिडीओत अप्पी ऊर्फ शिवानीने नारंगी रंगाची साडी नेसली आहे आणि ‘सूसेकी’ गाण्याची हुक स्टेप करत ती थिरकताना दिसतेय. तेवढ्यात गाण्यात एक ट्विस्ट येतो आणि या ट्विस्टबरोबरच सिंबा म्हणजेच साईराजदेखील येतो. या गाण्यालाच जोडून “एक लाजरान साजरा मुखडा…” हे गाणं वाजतं आणि यावर साईराज शिवानीबरोबर थिरकतो.

अप्पी आणि सिंबाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “या मुलाने मालिकेमध्ये खरा जीव आणला, म्हणून लोकं पुन्हा मालिका पाहू लागले.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “दोघंही सुपर क्यूट दिसतायत.” अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर करत या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

हेही वाचा… “माझ्या नावाचा गैरवापर…”, करण जोहरची न्यायालयात धाव, ‘या’ चित्रपटाच्या शीषर्कावर बंदी घालण्याची मागणी

दरम्यान, ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत शिवानी नाईक अप्पीची प्रमुख भूमिका साकारतेय, तर रोहित परशुराम अर्जुनची भूमिका साकारतोय. साईराज अप्पी आणि अर्जुनच्या मुलाचं सिंबा (अमोल) हे पात्र साकारतोय. या मालिकेत निलम वाडेकर, श्रीकांत कांता ठाकोरभाई, संतोष पाटील, सुनील डोंगर अशा अनेक कलाकारांच्या निर्णायक भूमिका आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appi amchi collector fame shivani naik sairaj kendre dance on pushpta 2 sooseki song dvr