एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अप्पू, शशांक, सुमन, माई, अण्णा, विनायक अशा बऱ्याच व्यक्तिरेखा असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे मालिका टीआरपीच्या यादीत देखील पहिल्या १० मालिकांमध्ये येते. काही दिवसांपूर्वीच या मालिकेमध्ये बिग बॉस फेम अभिनेता अक्षय वाघमारेची एंट्री झाली. अशातच आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री आईच्या आठवणीत भावुक, म्हणाल्या, “जमलं तर मला माफ कर कारण…”

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील आजच्या भागामध्ये बाबी आत्या परदेशातून परत का आली? यामागचं सत्य सांगताना दिसणार आहे. पण हे सत्य बाबी आत्याचा पती भास्करने यापूर्वीच विठ्ठू दादांना सांगितलं असतं. त्यामुळे शशांक, अप्पू बाबी आत्याला समजवतात दिसणार आहेत. यानंतर मालिकेत अप्पू आणि सुमीच डोहाळे जेवण पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; अलीकडेच सुयश टिळकची मालिकेत झाली होती एंट्री

या सगळ्या नाट्यानंतर मालिकेत एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. आत्या आजीची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं जातं. हेच पन्ना काकू अप्पूसह सगळ्यांना सांगून त्यांना काळजी घ्यायला सांगते. पण यावेळी सुमीचा पायरीवरून पाय घसरतो. तिला वाचवण्यासाठी अप्पू पुढे जाते आणि तिच पडून बेशुद्ध होते. त्यामुळे आता या घटनेनंतर अपूर्वाचा जीव धोक्यात येईल की ती यातून सुखरुप बाहेर पडेल हे येत्या काळातच समजणार आहे. याचा प्रोमो ‘मराठी टीव्ही इन्फो’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – लवकरच आई होणाऱ्या सई लोकूरला अभिनेत्री क्रांती रेडकरने दिला सल्ला; म्हणाली…

हेही वाचा – महाराष्ट्राला खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप; निलेश साबळे म्हणाले, “कायमस्वरुपी…”

दरम्यान, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. ईशा केसकर आणि अक्षर कोठारे यांची मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० प्रसारित होणार आहे. त्यामुळे यावेळेत सध्या सुरू असलेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ची वेळ बदलण्यात आली असून रात्री १० वाजता दाखवली जाणार आहे. म्हणून सध्या रात्री १० वाजता सुरू असलेली मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे.