‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली प्रेक्षकांच्या चांगली पसंती पडली आहे. अप्पू, शशांक, सुमन, माई, अण्णा, विनायक अशा मालिकेतील अनेक पात्रांनी अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण अशातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईशा केसकर व अक्षर कोठारे यांची नवी मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० प्रसारित होणार आहे. त्यामुळे यावेळेत सध्या सुरू असलेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ची वेळ बदलण्यात आली असून रात्री १० वाजता दाखवली जाणार आहे. म्हणून सध्या रात्री १० वाजता सुरू असलेली मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मालिकेत आता अप्पू मोठा त्याग करताना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: भीषण कार अपघातानंतर पहिल्यांदाच गायत्री जोशी आली समोर; पतीसह एका कार्यक्रमात झाली होती सहभागी

कालच्या भागामध्ये मालिकेत एक मोठा ट्वीस्ट पाहायला मिळाला. आत्या आजीची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल आहे. त्यामुळे सुहा आई, माई, विठ्ठू बाबा हे सगळे गावी गेले आहेत. हेच पन्ना काकू अप्पूला सांगून तिला व सुमीला काळजी घ्यायला सांगते. पण यावेळी सुमी पायरीवरून घसरते. तिला वाचवण्यासाठी अप्पू पुढे जाते अन् तिच पडून बेशुद्ध होते. त्यानंतर अप्पू व सुमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येते.

आता या नाट्यानंतर अप्पू मोठा त्याग करताना पाहायला मिळणार आहे. सुमीचं बाळ दगावल्यामुळे अप्पू तिचं बाळ तिला सांभाळायला देणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो ‘मराठी टीव्ही इन्फो’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार स्पृहा जोशी, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

हेही वाचा – राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळेंचं संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण; ‘ही’ प्रार्थना केली संगीतबद्ध

दरम्यान, एकाबाजूला मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत असले तरी दुसऱ्याबाजूला ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका ऑफ एअर होणार की नाही? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appu will give his own baby to sumi thipkyanchi rangoli marathi serial pps
Show comments