छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणून बिग बॉस या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. बिग बॉस या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. पण तिचे खासगी आयुष्य फारच चर्चेत राहिले आहे.

अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते. सध्या ती बिग बॉसमुळे चर्चेत आहे. अपूर्वा नेमळेकर बिग बॉसमध्ये अनेकदा तिच्या सिंगल असण्याबद्दल बोलली आहे. अनेकदा ती कार्यक्रमातही याबद्दल खुलासा करत असते. पण तुम्हाला माहितीये का? अपूर्वा नेमळेकरचा प्रेमविवाह झाला होता. काही महिन्यांनी मात्र त्यांचा घटस्फोट झाला.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” अपूर्वा नेमळेकरच्या ‘बिग बॉस मराठी’मधील खेळाबद्दल ‘अण्णा नाईक’ थेट बोलले

Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding actress reacts on trolling
“पियुष माणूस म्हणून कोणापर्यंतच पोहोचलेला नाही” लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर; म्हणाली, “त्याचा भूतकाळ हा…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi Police
Crime Story : सावत्र मुलीचं अपहरण अन् तिच्याबरोबरच थाटला संसार; हादरवून टाकणाऱ्या घटनेचा शोध दिल्ली पोलिसांनी चार वर्षांनी कसा घेतला?
country where divorce is illegal
‘या’ देशात घटस्फोट घेणे आहे बेकायदा; कारण काय? येथील लोक वेगळे होण्यासाठी काय करतात?
son-in-law dance with father-in-law
‘बाबा, असा जावई शोधून सापडणार नाही…’ भरमंडपात जावयानं भावी सासऱ्यांबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून कराल कौतुक
Man sets himself on fire
पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास दिला नकार, पतीनं उचललं धक्कादायक पाऊल
Aparna Vinod Divorces Husband Rinil Raj
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”
Nagpur, Love marriage, husband and wife ,
नागपूर : प्रेमविवाहानंतर ४,९४७ पती-पत्नीच्या संसारात विघ्न; भरोसा सेलकडून नवविवाहित दाम्पत्यांचे….

अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे नाव रोहन देशपांडे असे होते. त्यांचा विवाह २०१४ मध्ये पार पडला होता. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. अपूर्वा नेमळेकर आणि रोहन देशपांडे हे ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते लग्नबंधनात अडकले होते. त्या दोघांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला होता.

मुंबईत ते दोघेही लग्नबंधनात अडकले होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. तिच्या रिलेशनशिपबद्दल अनेकदा चर्चा सुरु असते. पण तिने त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही.

आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

तिच्या खासगी आयुष्यातील वादानंतर आता ती तिने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले आहे. अपूर्वा नेमळेकरची ‘आभास हा’ ही पहिली मालिका होते. त्याबरोबर ‘ती एका पेक्षा एक जोडीचा मामला’ यामध्येही झळकली होती. तिची ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेच्या दोन्हीही भागात तिने काम केले. तिने ‘आराधना’ या मालिकेतही काम केले होते. त्याबरोबर ‘तू माझा सांगती’ या मालिकेतही तिने उत्तम काम केले आहे.

Story img Loader