‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकांद्वारे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मध्ये अभिनेता राज हंसनाळे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यासह बालकलाकार इरा परवडे मुख्य भूमिकेत दिसतील. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये नेमके काय आहे? आणि मालिकेतील अन्य कलाकार कोण असतील? याबाबत जाणून घेऊयात…

हेही वाचा : “बरं झालं आईबरोबर एकही सीन नव्हता…”, विराजस कुलकर्णीने सांगितला ‘सुभेदार’च्या शूटिंगचा अनुभव; म्हणाला, “अंगावर काटा…”

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Heart-Melting Video
VIDEO : पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं! तरुणाने सादर केली प्रेमावरची कविता; म्हणाला,”एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा पडता येत नाही” VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

तेजश्री प्रधान या मालिकेत ‘मुक्ता’ ही भूमिका साकारणार आहे. मुक्ताचे लग्न झालेले नसल्याने तिचे आई-वडील चांगल्या मुलाच्या शोधात असतात, तर दुसरीकडे शेजारी राहणाऱ्या सागरचा घटस्फोट झालेला असतो. सागरला त्याला सई नावाची लहान मुलगी असते. सई आणि मुक्ता यांची चांगली गट्टी असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये सईच्या आईची झलक दाखवण्यात आली आहे.

हेही वाचा : Video : निक जोनसवर भर कार्यक्रमात चाहत्याने फेकली ‘ही’ वस्तू, संतप्त गायकाने हाताने केला इशारा अन्…

सईच्या आईची भूमिका ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अपूर्वा नेमळेकर साकारणार आहे. अपूर्वा मालिकेत सावनी ही खलनायिकेची भूमिका साकारेल असे प्रोमो पाहून लक्षात येते. सागर प्रोजेक्ट विसरल्यामुळे सई त्याच्यावर नाराज होऊन शाळेत जात असते. तेव्हाच अपूर्वाची एन्ट्री होते आणि ती सागरला सईची कस्टडी मी माझ्याकडे घेणार अशी धमकी देते. एवढ्यात मुक्ता येऊन सईकडे तिचा प्रोजेक्ट सूपूर्द करते असे या नव्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे एकंदर मालिकेत नात्यांची गुंफण पाहायला मिळेल असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

हेही वाचा : “ज्या लोकांची लायकी नाही…”, नवऱ्याची बाजू घेत क्रांती रेडकरने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “मला खरंच वाईट…”

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका येत्या ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तेजश्री प्रधान, राज हंसनाळे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्या व्यतिरिक्त शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार सुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारतील.

Story img Loader