Bigg Boss Marathi 5 वे पर्वातील सदस्यांची सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होताना दिसते. जेव्हा स्पर्धक बिग बॉसच्या घरात असतात, त्यावेळी त्याचे पडसाद बाहेरदेखील उमटताना दिसतात. आता अरबाज पटेल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि निक्कीबरोबरच्या त्याच्या जवळीकतेमुळे मोठ्या चर्चेत होता. आता घराबाहेर आल्यानंतर अरबाज पटेलने मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला अरबाज पटेल?

अरबाज पटेलने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी तू ज्या मुलीबरोबर कमिटेड आहेस, तिच्याबरोबर लग्न करणार आहेस का, तुम्ही एंगेज आहात, नेमकं काय आहे, त्या मुलीबद्दल ऐकायला आवडेल. यावर बोलताना अरबाजने म्हटले, “काही गोष्टी आहेत. मी इथे येत होतो तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितले ज्या गोष्टी पर्सनल आहेत त्या तशाच ठेव, त्या बाहेर काढू नको. तर मी त्यांचा आदर करतो. त्यांचा आदर ठेवून माझ्या वैयक्तिक गोष्टी आहेत त्या मी सांगू शकत नाही. मी जेव्हा आत होतो तेव्हा बाहेर काय झाले ते मला माहित नाही.”

Instagram teen accounts marathi news
विश्लेषण: इन्स्टाग्रामकडून आता ‘टीन अकाउंट्स’… खास किशोरवयीनांसाठी काय आहे ही सुविधा? कितपत सुरक्षित?
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan Saya aarya jadhao is strong player
“ती स्ट्राँग आहे”, वैभव चव्हाणचं आर्याबद्दल वक्तव्य; निक्कीबरोबर घडलेल्या ‘त्या’ घटनेविषयी म्हणाला, “तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर…”
Bigg Boss Marathi 5
Video : निक्की तांबोळीच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे अंकिता-अभिजीतमध्ये भांडण, म्हणाला,”स्वत: …”
Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
case has been registered against two people due to filming done before the suicide
आत्महत्येपूर्वी केलेल्या चित्रीकरणामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल
documentary making, Abhijit Kolhatkar, Shilpa Godbole, producer director duo, documentary, Urdu ghazal, Shashikala Shirgopikar, Reverb Production, passion project, artistic journey
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…
A youth who came to meet a friend was beaten up in front of Yerawada Jail Pune news
येरवडा कारागृहासमोर टोळक्याची दहशत; मित्राला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण

ज्या व्यक्तीशी तुझे नाव जोडले आहे घराबाहेर किंवा जिच्याशी तू कमिटेड आहे असं म्हटलं जातंय त्या व्यक्तीने पहिल्यांदा पोस्ट शेअर केली होती की अरबाज विषयी मला काही विचारू नका आणि त्यानंतर अशी पोस्ट शेअर केली होती की अरबाज मी कायम तुझ्याबरोबर असेन आणि तुमचा व्हिडीओ शेअर केला होता. यावर बोलतना अरबाजने म्हटले, “मी तेच म्हणतोय की मला माहित नाही की का अशी पोस्ट शेअर केलेली. मला असं वाटलेलं की मी एक शो करून आलो होतो त्यामधील माझी जी पार्टनर होती, त्यांचंपण काहीतरी झालेलं आहे. तर मी विचारलंच नाही की नेमकं काय झालेलं आहे. गेमबद्दल तुम्ही मला काहीही विचारा, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत मी काहीही सांगू शकतो मात्र माझ्या पाठीमागे काय झालंय त्याबद्दल काय सांगू”, असे अरबाजने म्हटले आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi : १०० नव्हे तर फक्त ७० दिवसांत संपणार पाचवा सीझन! ‘या’ दिवशी असेल ग्रँड फिनाले, जाणून घ्या…

बिग बॉसच्या निक्कीबरोबर मी जोडलो गेलो कारण निक्की माझ्यासाठी कम्फर्ट झोन होती. ती मला बाळासारखी ट्रीट करत होती, त्यामुळे मी तिच्याबरोबर जोडला गेलो. असे निक्कीबाबत बोलताना अरबाजने म्हटले आहे.

दरम्यान, अरबाज पटेल घरात असताना तो लीझा बिंद्राबरोबर कमिटेड असल्याचे म्हटले जात होते. लीझाने अरबाज पटेलसाठी पोस्टदेखील शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते. याबरोबरच, अरबाज पटेल याआधी स्प्लिट्सव्हिला १५ मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याची पार्टनर नायरा अहुजा होती. बाहेर आल्यानंतर नायराने अरबाज तिच्याशी खोटे वागल्याचे म्हटले होते. तिला लीझाबद्दल काहीच माहित नव्हते, असे नायराने म्हटले होते. आता येणाऱ्या काळात अरबाज त्याच्या नात्याविषयी स्पष्टीकरण देणार का, निक्की घराबाहेर आल्यानंतर त्यांच्यात काय समीकरणे असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.