Bigg Boss Marathi Fame Arbaz Patel : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे सध्या अरबाज पटेल सर्वत्र चर्चेत आहे. आठव्या आठवड्यात कमी मतं मिळाल्याने त्याने घराचा निरोप घेतला. घराबाहेर आल्यावर अरबाजने अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या.

निक्कीमुळे अरबाजचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास सर्वाधिक चर्चेत राहिला. त्यांच्या जोडीची सर्वत्र चर्चा झाली. यामुळेच घराबाहेर आल्यावर अनेक मुलाखतींमध्ये अरबाजला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. नुकत्याच ‘फिल्मीमंत्राला’ दिलेल्या मुलाखतीत अरबाजला लग्न आणि वैयक्तिक आयुष्याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावर अरबाजने काय स्पष्टीकरण दिलंय जाणून घेऊयात…

Milind Gawali
“कलाकारांनी एकतर लग्नच करू नये…”, मिलिंद गवळी असं का म्हणाले?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Dodi Khan Denies Marriage Plans With Rakhi Sawant_
राखी सावंतशी तिसरं लग्न करण्यास पाकिस्तानच्या डोडी खानचा नकार; म्हणाला, “मी तुझे लग्न माझ्या…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
rakhi sawant maarige to dodo khan pakistani
राखी सावंत ‘या’ पाकिस्तानी व्यक्तीबरोबर करणार तिसरं लग्न? विवाहाचे प्लॅन्स सांगत अभिनेत्री म्हणाली, “इस्लामिक पद्धतीने…”
Twinkle Khanna
“अक्षय कुमार असा लहान मुलगा…”, राजकीय विचारसरणी वेगळी असल्याच्या प्रश्नांवरून ट्विंकल खन्नाचा संताप, म्हणाली…
mrinal kulkarni writes special post for husband ruchir kulkarni
मृणाल कुलकर्णींच्या पतीला पाहिलंत का? ‘सोनपरी’ने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त लिहिली सुंदर पोस्ट, म्हणाल्या…

“जर इतर कोणत्या धर्मातील मुलीच्या तू प्रेमात पडलास…असं समज तू हिंदू मुलीच्या प्रेमात पडलास, तर तू दोन लग्न करणार का?” असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “मला असं वाटतं की, आजच्या काळात दोन लग्न सांभाळणं कोणालाच जमणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं करण्यास परवानगी सुद्धा नाहीये. आमच्या धर्मात चार लग्न करण्यास परवानगी आहे असं नेहमी बोललं जातं…पण, तो काळ आधीचा होता. त्या काळात अनेक युद्ध व्हायची. युद्धजन्य परिस्थितीत एखाद्या पुरुषाचं निधन झालं तर, पुढे एकट्या स्त्रीचं काय होईल असा सगळा सारासार विचार करून त्याकाळात निर्णय घेतले जायचे. पण, आता तर या गोष्टीला परवानगीच नाही. यापेक्षाही पुढे जाऊन सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पत्नीच्या परवानगीशिवाय दुसरं लग्न करणं पूर्णत: चुकीचं आहे.”

हेही वाचा : वडिलांना पाहताच अश्रूंचा बांध फुटला! धनंजयच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष; आई अन् पत्नीला पाहिल्यावर केलं असं काही…; पाहा व्हिडीओ

अरबाजला ( Arbaz Patel ) यानंतर दुसरा प्रश्न विचारण्याता आला. “जर तुला हिंदू मुलीशी लग्न करायचं असेल तर, तुम्ही हिंदु आणि मुस्लीम अशा दोन्ही संस्कृतीने लग्न करणार का?” यावर तो म्हणाला, “नाही असंही करू शकत नाही. आम्ही एकच लग्न करू शकतो. कारण, हिंदू मुलीशी लग्न करायचं असेल तर, ते लग्न निकाहमध्ये येत नाही. जर संबंधित मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला असेल तरच तो निकाह होतो. फक्त, कोर्ट मॅरेजमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह करताना अशा अडचणी येत नाहीत.”

Bigg Boss Marathi Fame Arbaz Patel
Bigg Boss Marathi Fame Arbaz Patel : अरबाज पटेल

हेही वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात अभिजीतची भेट घेतल्यावर पत्नी शिल्पाची पहिली पोस्ट! म्हणाली, “इतक्या दिवसांनंतर…”

लिव्हिंग रिलेशनशिपबद्दल काय म्हणाला अरबाज?

“आजच्या काळात तर परिस्थिती एवढी बदलली आहे की, लोक लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहून बघतात. जर दोघांचं एकमेकांशी चांगलं जमलं तर काहीच न करता संबंधित जोडपं आयुष्यभर एकत्र असतं आणि नाही जमलं तर दोघेही वेगळे होतात. माझ्याबद्दल सांगायचं झालं, तर मी लग्न नक्की करणार…आणि मी एकाच मुलीशी लग्न करणार.” असं स्पष्ट मत यावेळी अरबाज पटेलने ( Arbaz Patel ) मांडलं आहे.

Story img Loader