Bigg Boss Marathi 5 Arbaz Patel Breakup :बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक अरबाज पटेल सध्या खूप चर्चेत आहे. मागील आठवड्यात तो एलिमिनेट झाला होता. सर्वात कमी मतं त्याला मिळाल्याने तो घराबाहेर पडला. अरबाज एलिमिनेट झाल्यावर निक्की ढसाढसा रडली होती. त्यानंतर या आठवड्यात टॉप ८ स्पर्धकांच्या घरातील काही सदस्य बिग बॉसमध्ये आले. ‘फॅमिली वीक’मध्ये निक्कीचे आई-बाबा आले होते. यावेळी तिच्या आईने अरबाजबद्दल जी माहिती दिली त्यानंतर निक्की भडकली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बिग बॉसच्या घरात निक्की व अरबाज यांच्यात जवळीक होते. दोघे एकत्र गेम खेळत होते. घराबाहेर आल्यावर मनात निक्कीबद्दल भावना असल्याचं अरबाज पटेल म्हणाला होता. त्यानंतर अरबाजने घरात जाण्याआधी जिला गर्लफ्रेंड म्हटलं होतं, त्या लीझा बिंद्राने (Leeza Bindra) सोशल मीडियाला रामराम ठोकला. स्वतःची स्वप्न पूर्ण करायची वेळ आली आहे, या सगळ्या गोष्टीत वेळ वाया घालवायचा नाही, असं तिने म्हटलं होतं. अशातच निक्कीच्या आईने तिला सांगितलं की लोक अरबाजबद्दल बऱ्याच गोष्टी बोलत आहेत. तो कमिटेड आहे, त्याची इंगेजमेंट झाली आहे, त्यामुळे या गोष्टी बरोबर नाहीत. अरबाजची आई हे सगळं बघून आजारी पडली, त्याने आधी शो केले, त्यातील दोन मुली अरबाज कमिटेड असूनही घरी आल्या होत्या, मी कोणाकोणाला घरात घेऊ असं अरबाजची आई म्हणतेय, असं प्रमिला तांबोळी निक्कीला म्हणाल्या.
हेही वाचा – Bigg Boss Marathi: “माझा साखरपुडा…”, निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया
हे सगळं ऐकून निक्की भडकते. अरबाज-निक्कीचं जे होतं ते सगळं संपलं. निक्की अरबाजचे कपडे एका पिशवीत भरून बिग बॉसला फेकून द्यायला सांगते. यानंतर आता अरबाजने एका मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे. “मी ते सगळं पाहिलं. पण मलाच माहीत नाही की मी इंगेज्ड आहे. निक्की बिग बॉसच्या घरात आहे, तिला या सगळ्या गोष्टी माहीत नाहीत. निक्कीच्या आईने घरात गेल्यावर या गोष्टी का सांगितल्या, तेही मला माहीत नाही,” असं अरबाज पटेल ‘टेली मसाला’शी बोलताना म्हणाला.
अरबाज पटेलचा मोठा खुलासा
अरबाज पटेलने आता मोठं वक्तव्य केलं आहे. आपण आता कमिटेड नसल्याचं विधान त्याने केलं. “मी बिग बॉसच्या घरातच म्हटलं होतं की मी कमिटेड आहे. पण बाहेर आल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आता ज्या गोष्टी मी पाहिल्या आहेत आणि माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत, त्या सगळ्या बाजुला सारून मी पुढे जायचा विचार करतोय. मी कमिटेड होतो, पण आता मी कमिटेड नाही. या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या आहेत. मला आता या सर्व गोष्टींमध्ये पडायचं नाही,” असं अरबाज पटेल म्हणाला.
अरबाज पटेल लीझा बिंद्राबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. त्याने स्वतःच एका मुलाखतीत सांगितलं होतं. लीझाबरोबर लग्न करायचं आहे, आम्ही एकत्र व्हिडीओ बनवतो, लोकांना आमची जोडी आवडते, असंही तो म्हणाला होता. पण आता मात्र त्याने तो कमिटेड नसल्याचं म्हटलं आहे. जे नातं होतं ते संपलंय, असं त्याने सांगितलं.