Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’मधील सर्वाधिक चर्चेत राहणारे स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल (Nikki Tamboli Arbaz Patel) होय. निक्की व अरबाज यांचं प्रेम फुलताना या घरात पाहायला मिळतंय. त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं, नंतर दोघांनी ते भांडण सोडवलं. तेव्हापासून निक्की व अरबाज परत एकत्र गेम खेळत आहेत. निक्की म्हणेल ते ऐकताना अरबाज दिसत आहे. निक्की व अरबाज जवळ येत असताना अरबाजच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

अरबाज पटेलने बिग बॉसच्या घरात जाण्याआधी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत (Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra) लीझा बिंद्रा त्याची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं होतं. दोघेही एकत्र छान दिसतो, व्हिडीओ बनवतो. आम्हाला लग्न करायचं आहे, लवकरच लग्न करू असं तो या मुलाखतीत म्हणाला होता. दुसरीकडे लीझाच्या पोस्टवरून मात्र असं दिसतंय की ती आता अरबाजबरोबरचं नातं नाकारत आहे.

Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra 23
अरबाज पटेल व लीझा बिंद्रा (फोटो – इन्स्टाग्राम)

Arbaz Patel Girlfriend: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या

अरबाज पटेल बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर लीझाने बऱ्याच पोस्ट केल्या आहेत, ज्यावर निक्की व अरबाजबद्दलच्या कमेंट्स आहेत. तिने एक पोस्ट करून चाहत्यांना अरबाज व निकीसंदर्भात मेसेज व कमेंट्स न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता तिने पुन्हा एक पोस्ट केली आहे, ज्यात निक्की व अरबाजचा उल्लेख तिने केला आहे.

“बाप काढायचा नाही…”, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला मोठी शिक्षा! रितेश संतापून म्हणाला, “इथून पुढे…”

लीझा बिंद्राची पोस्ट

लीझाने एक सेल्फी पोस्ट करत लिहिलं, “माझ्या प्रिय मित्रांनो, मला कुणाबद्दलही वाईट गोष्टी ऐकायला आवडत नाही, मग त्या अरबाज आणि निक्कीबाबत असो किंवा इतर कुणाहीबद्दल असो. माझ्याजवळ कोणी आलं आणि कुणाहीबद्दल वाईट बोललं तर मी ते अजिबात ऐकून घेणार नाही. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार नाही. सगळं देवावर सोडून द्या. काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे आपल्याला खरंच माहीत नाही. त्यामुळे आपल्याला कोणालाही वाईट बोलण्याचा अधिकार नाही.”

Leeza Bindra Post
लीझा बिंद्राची पोस्ट

यानंतर लीझाने आणखी एक पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहिलं, “जर मी आजपर्यंत कधीच सोशल मीडियावर माझ्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलले नसेन तर मग ब्रेकअपबद्दल का बोलेन, त्यामुळे मला अशा खोट्या बातम्यांमध्ये अडकवू नका.”

अरबाज पटेलबद्दल ‘ती’ पोस्ट, आता त्याच्या गर्लफ्रेंडने थेट बॉलीवूड अभिनेत्यासह शेअर केला फोटो, कॅप्शनने वेधले लक्ष

अरबाजने मुलाखतीत स्वतः लीझाचं नाव घेतलं होतं. दोघांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकमेकांबरोबरचे फोटोही आहेत, ज्याला त्यांनी प्रेम व्यक्त करणारी कॅप्शन्स दिली आहेत. पण आता मात्र बिग बॉसच्या घरात जे घडतंय त्यानंतर लीझा अरबाजसोबतच्या नात्याबद्दल बोलणं टाळत आहे.

Story img Loader