Arbaz Patel Girlfriend Post about Nikki Tamboli: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या (Bigg Boss Marathi 5) पर्वात अरबाज पटेल व निक्की तांबोळी यांची जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. घरात दोघेही एकत्र असतात आणि गेमही एकत्र खेळतात. याच घरात अरबाजने त्याची बाहेर गर्लफ्रेंड असून तो कमिटेड असल्याचं सांगितलं. अरबाजची गर्लफ्रेंड तो बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सातत्याने पोस्ट करत असते. तिचं नाव लिझा बिंद्रा (Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra) आहे. अरबाजबद्दल मेसेज किंवा कमेंट करू नका असं म्हणणाऱ्या लिझाने आता अरबाजबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे.

लिझाने इन्स्टाग्रामवर बऱ्याच पोस्ट केल्या आहेत. त्या सर्व पोस्टमध्ये ती अरबाजबरोबर दिसत आहे. तिने तिचा व अरबाजचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये “मी वचन देते की मी कायम तुझ्यासोबत असेन” असं लिहिलं आहे. तिने या पोस्टमध्ये अरबाजला टॅग केलं आहे.

Arbaz Patel Girlfriend: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या

पाहा व्हिडीओ –

लीझाने स्टोरी पोस्ट केल्या. त्यात अरबाजबरोबरचा रोमँटिक फोटो शेअर करत तिने लिहिलं, “तुझ्या चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमी तुझ्याबरोबर असेन. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही.”

leeza bindra post for boyfriend arbaz patel
लीझा बिंद्राने केलेली पोस्ट

दुसऱ्या स्टोरीमध्ये लीझाने लिहिलं, “मी अरबाजच्या आईला आपल्या मुलासाठी दुआ मागताना पाहिलं आहे. तो शोमध्ये फक्त त्याच्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो अजिबात चुकीचा नाही. तो चुकीचा तेव्हा असता जर त्या मुलीला माहीत नसतं की तो माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. रितेश सरांनी त्या मुलीला दोनदा सांगितलं आहे, तरीही…”

“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…

arbaz patel girlfriend on nikki tamboli
रितेश देशमुखचा उल्लेख करत लीझा बिंद्राची पोस्ट

लीझाने अरबाजबरोबरचा आणखी एक रोमँटिक फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली. “एक शो कोणाचंही नातं तोडू शकत नाही. होय. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. मी त्याच्याशी कधीच ब्रेकअप करणार नाही,” असं या फोटोवर लिहित लीझाने अरबाजला टॅग केलं आहे.

Leeza bindra in relationship with arbaz patel
लीझा बिंद्राची पोस्ट

लीझाने अरबाजचा एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याचं लीझावर प्रेम आहे असं म्हणताना दिसतो. माझं लीझावर प्रेम आहे, मी तिच्याशी लग्न करणार आहे, बाकीचे कोण काय बोलतात याचा मला फरक पडत नाही, असं तो म्हणताना दिसतोय.

Bigg Boss Marathi: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडची नवीन पोस्ट; म्हणाली, “तो आणि निक्की…”

दरम्यान, सुरुवातीला बिग बॉसमध्ये निक्की-अरबाज जवळ आल्यावर लीझा नाराजी दाखवणाऱ्या पोस्ट शेअर करत होती. त्यानंतर एकदा तिने पोस्ट करून अरबाजबद्दल कमेंट किंवा मेसेज करू नका असं म्हटलं होतं. त्यानंतर तिने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण अवघ्या चार दिवसांत ती सोशल मीडियावर परतली असून आता तिने अरबाज पटेलवर प्रेम असल्याची कबुली दिली आहे.