Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे अरबाज पटेल सध्या खूप चर्चेत आहे. शोमधील अरबाज व निक्की तांबोळीची जवळीक आणि अरबाजच्या एलिमिनेशननंतर ज्या पद्धतीने निक्की रडली त्याच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा आहे. कमिटेड अरबाजने निक्कीबद्दल मनात भावना असल्याचंही म्हटलं आहे. अरबाज पटेल बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी म्हणाला होता की लीझा बिंद्रा त्याची गर्लफ्रेंड आहे, पण शोमध्ये त्याची निक्कीशी जवळीच वाढली. त्यानंतर लीझा सातत्याने पोस्ट करत असते.

अरबाज पटेलने बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावरही निक्कीबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडने पोलीस तक्रार करण्याचा सल्ला देणाऱ्यांना उत्तर देणारी पोस्ट केली होती. आता तिने इन्स्टाग्राम सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लीझाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अरबाज पटेलविरोधात त्याची गर्लफ्रेंड पोलीस तक्रार करणार? म्हणाली, “तो चुकीचा माणूस…”

लीझाने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यावर मजकूर लिहिला आहे. “आता स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आता आणखी वेळ वाया घालवणार नाही. मला वाटतं माझा तुमच्याबरोबरचा प्रवास इथपर्यंतच होता. तुम्हा सर्वांकडून मला खूप चांगल्या आठवणी मिळाल्या आहेत. मी तुम्हा सर्वांना कधीच विसरणार नाही, तुम्हीही मला विसरू नका. मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करेन,” असं लीझाने शेअर केलेल्या व्हिडीओवर लिहिलं आहे. लीझाने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

“तिच्यासाठी माझ्या मनात…”, बिग बॉसच्या घराबाहेर येताच निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाज पटेलचं भाष्य; म्हणाला, “माझी चूक…”

लीझाने शेअर केलेला व्हिडीओ-

लीझा बिंद्राने शेअर केलेला व्हिडीओ (सौजन्य इन्स्टाग्राम)

लीझाने दुसऱ्या पोस्टमध्ये इन्स्टाग्राम सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. “गूड बाय इन्स्टाग्राम फॅमिली” असं लिहिलेला एक फोटो तिने शेअर केला आहे.

leeza bindra instagram
लीझा बिंद्राची पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

लीझा बिंद्रा भारतात राहत नाही. अरबाज बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर लीझा त्याला भेटलेली नाही. निक्कीबद्दल अरबाजने जी वक्तव्ये केली, त्यानंतर तिने नाराजी व्यक्त करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. पण अरबाजचं नाव घेत बोलणं टाळलं. तसेच ती अरबाजला इन्स्टाग्रामवर फॉलोही करत नाही. त्यामुळे ही पोस्ट फक्त इन्स्टाग्राम सोडण्याबाबत होती की अप्रत्यक्ष अरबाजसाठी होती, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरला? सूरज चव्हाण, अंकिता नव्हे तर ‘हा’ सदस्य मारणार बाजी, ‘तो’ फोटो चर्चेत

लीझाने सोमवारी एक पोस्ट केली होती, ज्यात पोलीस तक्रारीचा उल्लेख होता. “तुम्हाला पोलीस तक्रारीचा अर्थ समजतो का?
तुम्ही सगळे मला त्याच्याविरोधात पोलीस तक्रार करायला सांगत आहात, का करू? कशासाठी करू? नाही मला नाही करायची पोलीस तक्रार. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हेच सांगतेय की तो चुकीचा माणूस नाही.
प्लीज त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा”, अशी स्टोरी लीझाने पोस्ट केली होती.

Story img Loader