Bigg Boss Marathi Arbaz Patel : ‘बिग बॉस मराठी’मुळे अरबाज पटेल सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या सीझनमध्ये त्याची आणि निक्की तांबोळीची जोडी जमली होती. निक्की-अरबाजची मैत्री, त्यांच्यातील नातं याची घराबाहेर देखील चर्चा चालू झाली. यामागचं कारण म्हणजे अरबाजने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश घेण्याआधी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती. यामध्ये त्याने लीझा बिंद्राबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं.

याशिवाय एके दिवशी बिग बॉसच्या घरात आलेल्या पाहुण्यांसमोर देखील अरबाजने आधीच ‘कमिटेड’ असल्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे निक्कीबरोबर अरबाजने फक्त शोसाठी नातं निर्माण केलंय का? असे सगळे प्रश्न उपस्थित होऊ लागले.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Aishwarya Rai Abhishek Bachchan
“ऐश्वर्या-अभिषेक बच्चनचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध…”, ‘कुछ ना कहो’फेम अभिनेत्रीचा खुलासा

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात येण्यापूर्वी अरबाज Splitsvilla या शोमध्ये सहभागी झाला होता. Splitsvilla हा शो पूर्णपणे कनेक्शनवर आधारित आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी जोडीने परफॉर्म करणं भाग असतं. Splitsvilla मध्ये अरबाजची कनेक्शन पार्टनर नायरा अहुजा होती. अरबाज शोच्या बाहेर लीझा बिंद्राशी कमिटेड असल्याने यापूर्वीच नायराने अनेक मुलाखतींमध्ये रोखठोक मतं मांडत अरबाजवर गंभीर आरोप केले होते. मात्र, दुसरीकडे अरबाजने तिचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा : पंढरीनाथच्या Elimination मुळे मराठी अभिनेत्रीला धक्का; जान्हवीचं नाव घेऊन ‘बिग बॉस’ला थेट सवाल, म्हणाली…

नायरा अरबाजबद्दल ( Arbaz Patel ) काय म्हणाली?

नायराने नुकतीच ‘फिल्मीग्यान’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी नायराला Splitsvilla मधील काही सदस्यांविषयी प्रश्न विचारण्यात आले. जसवंतचं नाव घेतल्यावर त्याला #डिसेंट अशी उपमा नायराने दिली. पुढे, अरबाजचं नाव घेतल्यावर नायराने स्पष्टपणे, “त्याच्याबद्दल मी काय बोलू? #अनेक बायकांचा नवरा ( Husband of Many Wives )” अशी प्रतिक्रिया दिली. तसेच “सगळ्या मुली त्याच्या मागे लागतात” या अरबाजच्या आईने केलेल्या वक्तव्यावर देखील नायराने नाराजी व्यक्त केली आहे. सध्या नायराचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

Bigg Boss Marathi Arbaz Patel
नायरा अहुजाची अरबाजबाबत प्रतिक्रिया

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अरबाज ( Arbaz Patel ) आणि नायरा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे दोघांनाही हिंदी बिग बॉसच्या १८ व्या सीझनमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे अशा मागण्या नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

Story img Loader