Bigg Boss Marathi 5 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची कोणत्या ना कोणत्या कारणावरून सातत्याने चर्चा रंगलेली दिसते. जेव्हा हे स्पर्धक शोचा भाग असतात, त्यावेळी बिग बॉसने दिलेले टास्क, वादविवाद, भांडणे, इतर स्पर्धकांशी असलेली समीकरणे यांमुळे हे स्पर्धक चर्चेचा भाग बनतात. तर, शोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या वक्तव्यामुळे या स्पर्धकांबाबत चर्चा होताना दिसते. आता अरबाज पटेलने निक्की तांबोळीला प्रपोज करण्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.
निक्कीला प्रपोज करण्याविषयी काय म्हणाला अरबाज पटेल?
अरबाज पटेलने नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याला कॅमेऱ्यासमोर निक्कीला कसं प्रपोज करशील, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर, “जर निक्कीला प्रपोज केले, तर ते खूप स्पेशल असणार. ते स्पेशल म्हणजे तिच्यासमोरच असेल. ते मी असं सांगू शकत नाही. जर निक्कीला हे नाते पुढे न्यायचे असेल, तर कॅमेऱ्यासमोरच प्रपोज करणार”, असे अरबाजने म्हटले आहे.
जर निक्कीला तुझ्याबरोबर हे नाते पुढे न्यायचे नसेल, तर तुझ्या हातातून दोन्ही गोष्टी निघून जातील, असं तुला वाटत नाही का? त्यावर उत्तर देताना अरबाज पटेलने म्हटले, “माझ्या हातात काय ते आता देवालाच माहीत आहे. आपण जसा विचार करतो, तसं सतत होत नाही. असं म्हणतात की, जोड्या आधीच ठरलेल्या असतात. तर जोडीमध्ये कोण आहे, काय आहे हे आपल्याला माहीत नाही आणि आता करिअर सुरू झालं आहे. त्यामुळे आता करिअरवरती जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण- घर चालवायचं आहे, तर करिअर चांगलं पाहिजे. करिअर सुरू असताना काही चांगलं झालं, तर तुम्हाला सगळ्यांना ते दिसणारच आहे.”
निक्कीसाठी काय मेसेज देशील? यावर बोलताना अरबाजने म्हटले, “ती सतत रडत आहे. ते पूर्ण दाखवत नाहीत; पण तिचे डोळे खूप सुजलेले आहेत. माझे तिला हेच सांगणे आहे की, तू स्ट्राँग हो आणि ट्रॉफी घेऊनच ये.”
हेही वाचा: “…सत्य बदलू शकत नाही”, उर्मिला मातोंडकरशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पती मोहसीनची पोस्ट चर्चेत
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते. कमी मते मिळाल्यामुळे अरबाज पटेलला शोमधून बाहेर पडावे लागले. बाहेर आल्यानंतर बिग बॉसच्या घरात निक्की माझा कम्फर्ट झोन होती. ती माझी काळजी घ्यायची आणि त्यामुळे मी तिच्याबरोबर जोडला गेलो, असे त्याने म्हटले होते.
© IE Online Media Services (P) Ltd