Arbaz Patel post for Nikki Tamboli : बिग बॉस मराठीच्या पाचव्या (Bigg Boss Marathi 5) पर्वात या आठवड्यात घरातील सर्व ८ सदस्य नॉमिनेटेड होते. सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सर्व स्पर्धकांपैकी पहिल्या दोन राउंडमध्ये सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत सुरक्षित झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फुलवंती’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनी बिग बॉसच्या घरात आले होते. या दोघांनी स्पर्धकांना एक डान्स टास्क दिला. त्यानंतर घरातून बाहेर पडताना सुरक्षित सदस्यांच्या नावाची घोषणा केली. प्राजक्ता माळीने सूरज चव्हाण सुरक्षित असल्याचं सांगितलं. तर गश्मीर महाजनीने निक्की सुरक्षित असल्याची घोषणा केली. निक्की सुरक्षित होताच अरबाज पटेलने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा — Bigg Boss मध्ये गैरहजर राहणाऱ्या रितेश देशमुखचा परदेशातील व्हिडीओ आला समोर! जिनिलीया म्हणते, “बाबाला २० दिवसांनी…”

अरबाज पटेलची प्रतिक्रिया

अरबाजने इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलवर एक व्हॉइस नोट शेअर करून निक्कीला सुरक्षित केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. “निक्कीला सुरक्षित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मनापासून आभार, आज पहिल्या फेरीतच निक्की सेफ झाली आहे. सेफ होणारी दुसरी स्पर्धक आहे. मला खूप आनंद झाला की तुम्ही इतकं प्रेम आणि पाठिंबा देत आहात. आता फिनाले जवळ आला आहे, त्यामुळे जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना माहीत आहे की मी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, पण ती ट्रॉफी निक्कीला मिळायला पाहिजे. त्यामुळे तिला भरपूर वोट करा,” असं अरबाजने या व्हॉइस नोटमध्ये म्हटलं आहे.

अरबाज पटेल व निक्की तांबोळी

Bigg Boss Marathi – “त्या सीझनमध्ये एकाही मुलाला सोडलं नाहीस”, राखी सावंतने केली निक्कीची बोलती बंद; म्हणाली, “आय लव्ह यू बोलून…”

अरबाज पटेल व निक्की तांबोळी यांच्यात बिग बॉसच्या घरात जवळीक वाढली. पण मागच्या आठवड्यात अरबाज एलिमिनेट झाला. त्यानंतर निक्कीची आई घरात आल्यावर त्यांनी अरबाजची इंगेजमेंट झाल्याचा खुलासा केला आणि निक्की खूप भडकल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना माझा साखरपुडा किंवा लग्न झालेलं नाही. निक्की घराबाहेर आल्यावर तिला या सगळ्या गोष्टी सांगणार असल्याचं अरबाज पटेल म्हणाला होता. आताही तो निक्कीला वोट देण्याचं आवाहन चाहत्यांना करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaz patel post after nikki tamboli safe bigg boss marathi 5 hrc