सध्या टीव्ही विश्वात राखी सावंत आणि ‘बिग बॉस १६’ खूप चर्चेत आहेत. राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर ‘बिग बॉस’ फिनालेमुळे चर्चेत आहे. रविवारी १२ फेब्रुवारी रोजी बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार आहे. त्यापूर्वी घरातील टॉप ५ स्पर्धक शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, अर्चना गौतम, एमसी स्टॅन व शालीन भानोत यांची एक पत्रकार परिषद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Video: “हिला कोणीतरी आवरा” राखी सावंतचा ‘तो’ व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, “रस्त्यावर…”

या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर दिली. याच दरम्यान, अर्चना गौतमवर एका पत्रकाराने टिप्पणी केली, त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप व्हायरल झाले आहेत. तिला तू राखी सावंतसारखी वाटतेस, असं म्हटल्यावर अर्चना थोडी निराश होतं, मी तशी दिसते का? असा प्रतिप्रश्न तिने केला. त्यानंतर प्रियंकाने परिस्थिती सांभाळून घेत ते तुझं कौतुक करत आहेत. राखी सावंत चांगली एंटरटेनर आहे, असं ती म्हणाली.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करून राखी आणि अर्चनाची तुलना केल्याबदद्ल संताप व्यक्त करत आहे. अर्चना चांगली आहे, तिची राखीशी तुलना करणं चुकीचं असल्याचं काही नेटकरी म्हणाले आहेत.