‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने निभावलेलं पात्र घराघरात पोहोचलं आहे. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मात्र अशातच ‘रमा राघव’ मालिकेतील एका अभिनेत्रीची एक्झिट झाल्याचं समोर आहे. यासंबंधिताचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – अभिनेत्री मीरा जोशी झळकणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत; शरद पोंक्षेंबरोबर करणार काम

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Muramba
Video: एकीकडे माही रमाचे रूप घेणार, तर दुसरीकडे रमा जिवंत…; ‘मुरांबा’ मालिकेत नवीन वळण
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ

‘रमा राघव’ या मालिकेत पूजा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अर्चना निपाणकरने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यासंबंधित कारण देखील तिनं व्हिडीओद्वारे सांगितलं आहे. आता पूजा हे पात्र अभिनेत्री श्वेता अंबिकर साकारणार आहे. अर्चनाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती म्हणाली की, “आतापर्यंत तुम्ही मला ‘रमा राघव’ मालिकेत पूजाची भूमिका साकारताना पाहत होता. तुम्ही सगळ्यांनीच या भूमिकेवर प्रेम केलं. माझ्या कामाच खूप कौतुक केलं. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. पण दुर्दैवाने माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला ही मालिका सोडावी लागतं आहे. अर्थात या सगळ्यात कलर्स मराठीची टीम, माझं प्रोडक्शन क्रिएटीव्ह ट्रान्समीडिया आणि माझ्या मालिकेची संपूर्ण टीम या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं. तसेच खूप मदत केल्यामुळे अर्थात हे सगळं शक्य झालंय.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लाडक्या दादूसने ‘या’ फोटो मागची सांगितली गोष्ट; म्हणाला, “हा फोन….”

“पण आनंदाची बातमी अशी आहे की, पूजाची भूमिका आता अत्यंत गुणी आणि छान अभिनेत्री श्वेता अंबिकर साकारणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, जसं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, पूजावर प्रेम केलं, तसंच तुम्ही नवीन पूजावर म्हणजे श्वेता अंबिकरवर सुद्धा प्रेम कराल आणि तिला आपलंस करून घ्याल, असा माझा विश्वास आहे. आतापर्यंत तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल, माझं जे इतके दिवस तुम्ही कौतुक केलं त्या सगळ्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद,” असं अर्चना निपाणकर म्हणाली.

हेही वाचा – “अबाया परिधान केल्याने कोणी मुस्लिम होत नाही…” गौहर खानने नाव न घेता राखी सावंतवर केली टीका, म्हणाली…

हेही वाचा – ‘वाळवी’नंतर पुन्हा एकदा स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वे झळकणार ‘या’ चित्रपटात; अभिनेत्रीने शेअर केली पहिली झलक

दरम्यान, अर्चनाच्या अचानक एक्झिटमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या खालील प्रतिक्रियेत एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “अरे बापरे अर्चना मॅम मी तर फक्त तुमच्यासाठी ही मालिका बघायचो. लवकरच नवीन मालिकेत अथवा चित्रपटामध्ये वाट बघू.” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “बिग बॉस मराठी सुरू होतंय ना…तू आहेस का?” तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “पूजा तू मालिका का सोडली? तुझी खूप आठवण येईल. तुझा अभिनय खूप छान होता.”

Story img Loader