सध्या बिग बॉस १६ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. एकीकडे सुंबुल तौकीर खान, टीना दत्ता आणि शालीन भानोत यांच्यावरून सुरू झालेला वाद संपायचं नाव घेत नाही आहे. तर दुसरीकडे अर्चना गौतमच्या बेशिस्त वागण्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. एवढंच नव्हे तर अर्चनाच्या चुकीमुळे बिग बॉसने घरातील सदस्याची रसद काढून घेतली आहे. अशात आता आणखी एका कारणाने अर्चना गौतम चर्चेत आली आहे ते म्हणजे मराठी बिग बॉसबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे. शिव ठाकरेशी बोलताना अर्चनाने हे विधान केलं आहे.

अर्चना गौतमसह इतर काही सदस्य झोपल्यामुळे बिग बॉसने त्यांना शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेला अर्चनाने विरोध केला. त्यानंतर शिव ठाकरेशी तिचं भांडणं झालं. या भांडणात तिने शिवबरोबर बोलताना मराठी बिग बॉसबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. ती शिव ठाकरेला म्हणते, “बिग बॉस मराठीमध्ये गावतले लोक येतात त्यामुळे तू जिंकला असशील पण हे हिंदी बिग बॉस आहे. या ठिकाणी तुझं काही चालणार नाही. इथे अर्चना आली आहे.” त्यावर शिव तिला सांगतो, “मी बिग बॉसच्या घराचा नेहमीच आदर करतो. मला माझी जबाबदारी माहीत आहे आणि माझी काहीतरी पात्रता आहे म्हणूनच मी इथे आलो आहे.”

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

आणखी वाचा- ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून समृद्धी जाधव बाहेर; ठरली होती पहिली कॅप्टन

अर्चना गौतमचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत असून त्यानंतर अर्चनावर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर चाहते करताना दिसत आहे. एका युजरने अर्चनाचा हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “बिग बॉस मराठी म्हणजे काही सोप्पा खेळ नाही. अर्चना सातत्याने मराठी बिग बॉसवर कमेंट करून अपमान करत आहे. तिने शिवचाही अपमान केला आहे.”

याशिवाय आणखी एक युजरने एक व्हिडीओ शेअर करत अर्चना गौतमच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलंय, “अर्चना शिव ठाकरेला म्हणाली की बिग बॉस मराठीमध्ये गावातले लोक येतात म्हणून तू जिंकला आहेस. तिने पुन्हा मराठी लोकांचा अपमान केला आहे. ही अर्चना जर मराठी बिग बॉसमध्ये असती तर एक दिवसही टिकू शकली नसती.” आपल्या व्हिडीओमध्ये या युजरने मराठी बिग बॉसमधील टास्क आणि त्यासाठी सदस्यांकडून घेतली जाणारी मेहनत याकडे लक्ष वेधलं आहे.

Story img Loader