Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवसी कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कच्या वेळी श्रुतिका आणि एलिसमध्ये जोरदार वाद झाले; जे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. श्रुतिकाने तिच्या बोलण्याच्या दाक्षिणात्य लहेजाची एलिसने खिल्ली उडवल्याचा आरोप केला. जो एलिसने फेटाळला. एवढंच नाहीतर तिचा इतका पार चढला की तिने श्रुतिकाला शिवी दिली. पण कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणी बाजी मारली? जाणून घ्या…

सध्या ‘बिग बॉस’च्या घरात १८ सदस्य आहेत. या १८ सदस्यांना कॅप्टन्सी टास्कमध्ये एका सदस्याला बाद करायचे होते. ज्या सदस्याचं नाव बाद होणार नाही, तो ‘टाइम गॉड’ होणार होता. सदस्यांना बाद करणाऱ्या सदस्याच्या नावाची बाहुली राक्षसच्या जिभेवरील खिळ्यात घुसवायची होती.

हेही वाचा – “रागावू नका…” म्हणत स्पृहा जोशीने केली पोस्ट, आई-वडिलांचा रुग्णालयातील फोटो केला शेअर; नेमकं काय झालं? वाचा

पहिल्या फेरीत नऊ सदस्य गेले. यावेळी तजिंदर पाल सिंह बग्गा, गुणरत्न सदावर्ते, शिल्पा शिरोडकर, शहजारा, सारा, ईशा सिंह, चाहत पांडे, करण मेहरा, श्रुतिका अर्जुन बाद झाले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत अविनाश मिश्रा, एलिस, विविय, मुस्कान, हेमा, रजत, नायरा, चुम बाद झाले. अखेर अरफीन खानचं नाव राहिलं आणि तो ‘टाइम गॉड’ म्हणजे पहिला कॅप्टन झाला.

हेही वाचा – राहा कपूर बाबा रणबीरला ‘या’ टोपण नावाने मारते हाक, आलिया भट्टने केला खुलासा

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते अचानक ‘बिग बॉस १८’च्या घराबाहेर? नेमकं काय घडलं, जाणून घ्या

दुसऱ्या आठवड्यात ‘हे’ सदस्य नॉमिनेट

दरम्यान, दुसऱ्या आठवड्यात रजत, तजिंदर, श्रुतिका, हेमा, शिल्पा, चाहत, करण, मुस्कान हे आठ सदस्य नॉमिनेट झाल्याचं समोर आलं आहे. पण, दुसऱ्या बाजूला गुणरत्न सदावर्ते घराबाहेर झाल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवरील प्रलंबित सुनावणी बाकी राहिल्यामुळे गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मधून बेघर झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, ते कायमचे बेघर झाले नसून त्यांची पुन्हा ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात एन्ट्री होणार आहे.