काही मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत लाडक्या असतात. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector) ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अमोलच्या आजारपणाचे सीन मालिकेत पाहायला मिळत आहे. याबरोबरच अमोलच्या हट्टासाठी अप्पी व अर्जुनने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

परमेश्वरा या बापाची तळमळ…

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की ऑपरेशन थिएटरटच्या बाहेर अप्पी-अर्जुनसह त्यांचे संपूर्ण कुटुंब आहे. ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर येतात आणि अप्पी-अर्जुनला म्हणतात, “अमोलच्या ऑपरेशननंतर काही कॉम्प्लिकेशन आलेत. त्यामुळे आय एम सॉरी”, असे म्हणून डॉक्टर निघून जातात. ऑपरेशन रूमध्ये असलेल्या अमोलजवळ अप्पी-अर्जुन जातात. अप्पी अमोलला म्हणते, मी तुला असं हरू देणार आहे का? तू म्हटला होतास ना, आम्ही लग्न केलंय”, त्यानंतर अप्पी व अर्जुन मोठमोठ्याने रडताना दिसतात. तितक्यात अप्पीला अमोलचा हात हलताना दिसतो. ते डॉक्टरला बोलवतात. डॉक्टर म्हणतात की हे अविश्वसनीय आहे. त्याचे हार्टलाइनसुद्धा सुरू होऊ शकतात. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की अर्जुन दवाखान्यातील गणपतीसमोर गुडघ्यांवर बसतो व हात जोडून म्हणतो, “परमेश्वरा,या बापाची तळमळ एक बाप म्हणून समजून घे ना”. याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अमोलला शुद्ध आली असून अर्जुन व अप्पी त्याच्याशी गप्पा मारत आहेत. त्याला ते सांगतात की त्यांनी लग्न केले आहे.

‘अप्पी आमची कलेक्टर’मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “देव आईबापाचा धावा ऐकेल का, त्यांचा अमोल त्यांना परत मिळेल का..?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अमोलला कॅन्सर झाला होता. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून औषधोपचार चालू होते. यादरम्यान त्याच्या आई-वडिलांनी म्हणजेचे अप्पी-अर्जुनने पून्हा एकदा लग्न करावे, अशी त्याने इच्छा व्यक्ते केली होती. त्याच्या इच्छेप्रमाणे अप्पी व अर्जुनने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचे दिसले. आता अमोल बरा झाल असून ते कायम हॅपी फॅमिली म्हणून राहणार असल्याचे अर्जुनने त्याला सांगितले आहे.

हेही वाचा: ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”

आता मालिकेत पुढे काय होणार, पुढे मालिकेचे कथानक कोणते नवीन वळण घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader