Aroh Welankar New Villa : अलीकडच्या काळात अनेक मराठी कलाकार आपल्या हक्काच्या घरासमवेत एक वेगळं वीकेंड होम खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी व्हिला, बंगले, फार्महाऊस, आलिशान हॉटेल खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. आता यामध्ये आणखी एका मराठी अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि ‘बिग बॉस’सारख्या शोमधून घराघरांत पोहोचलेला आरोह वेलणकर आता आलिशान व्हिलाचा मालक झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेगे’ चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत पानसेंनी केलं होतं. या पहिल्याच चित्रपटातून आरोहला घराघरांत लोकप्रियता मिळाली. यानंतर त्याने अनेक मराठी चित्रपट व लोकप्रिय मालिकेत काम देखील केलं. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाल्याने तो पुन्हा एकदा घराघरांत लोकप्रिय झाला. आता अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

हेही वाचा : Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?

पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला

आरोहने ( Aroh Welankar ) पुण्यात ‘Sage Villa’ या प्रोजेक्टमध्ये एक व्हिला बूक केला आहे. याचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “नवीन हँगआउट स्पॉटला ‘हॅलो’ म्हणा…” असं भन्नाट कॅप्शन देत अभिनेत्याने या नवीन व्हिलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या नवीन व्हिलाला अभिनेत्याने काहीसा मॉर्डन टच दिल्याचं याचे फोटो पाहून लक्षात येतं.

नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळींनी या नवीन व्हिलासाठी आरोहवर ( Aroh Welankar ) कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार

हेही वाचा : Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आरोहने ( Aroh Welankar ) बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती. हा आरोहचा पहिलाच हिंदी चित्रपट होता. याशिवाय आरोह ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात सुद्धा वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून झळकला होता. त्याला ‘फनरल’ सिनेमा देखील गाजला. याशिवाय ‘लाडची मी लेक गं’ या मालिकेत त्याने काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aroh welankar marathi actor bought new villa in pune shared photos sva 00