‘बिग बॉस’ हिंदीच हे १६वं पर्व सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच हे पर्व यंदाच्या स्पर्धकांमुळे चर्चेत आलं होतं. हे पर्व संपायला शेवटचे काही दिवस उरले आहेत. आता लवकरच या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. यंदाची ट्राफिक कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं दिसत आहे. यंदाच्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे व्हावा असंच सगळ्यांना वाटतं. पण आता एक फोटो व्हायरल होत आहे ज्याच शिव ठाकरे नाही तर दुसऱ्याच स्पर्धकाच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी दिसत आहे.
या पर्वाच्या टॉप पाच स्पर्धकांची नावे समोर आली. त्यातून नुकतीच घरातून मिड वीक एव्हिक्शन झालं असून निम्रत कौर बाहेर पडली. आता शिव ठाकरे, अर्चना गौतम, स्टॅन, शालीन आणि प्रियांका चौधरी या चार जणांमध्ये ‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. आता या चार जणांमधून विजेतेपद शिव ठाकरेला मिळावा अशी अनेकांची इच्छा आहे. परंतु बिग बॉसच्या आधीच्या पर्वाची स्पर्धक अर्शी खान हिने फिनाले आधीच ‘बिग बॉस १६’ च्या विजेत्याचं नाव आणि फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस १६’ शिव ठाकरेसाठी ठरलं खास! आता झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?
अर्शीने प्रियांका चहर चौधरीचा एक फोटो ट्वीट केला. विशेष म्हणजे या फोटोमध्ये प्रियांकाच्या हातात बिग बॉस ची ट्रॉफी दिसत आहे. त्यामुळे शिव ठाकरेला मागे टाकत ‘बिग बॉस १६’ची विजेती प्रियांका चहर चौधरी झाल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत. या ट्विटवर नेटकरी आणि बिग बॉसचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करत अनेकांनी प्रियांकाचं अभिनंदन केलं आहे. परंतु ती खरच ‘बिग बॉस १६’ ची विजेती झाली का हे आपल्याला दोन दिवसातच कळेल.
हेही वाचा : Bigg boss 16: विजेता स्पर्धक होणार मालामाल, बक्षीस म्हणून मिळणार तब्बल ‘इतके’ लाख
दरम्यान ‘बिग बॉस १६’चा महाअंतिम सोहळा १२ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. नुकतीच ‘बिग बॉस १६’च्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवण्यात आली. यंदाची ट्रॉफी आत्तापर्यंतच्या असलेल्या ट्रॉफींपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि खास आहे. यावेळी ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीमध्ये एक युनिकॉर्न बनवण्यात आला आहे, जो चांदी आणि सोनेरी रंगाचा आहे. ही ट्रॉफी कोणाच्या हातात जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.