‘शार्क टॅंक इंडिया’ फेम परीक्षक अशनीर ग्रोव्हर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. अशनीरने ‘शार्क टॅंक इंडिया’च्या पहिल्या सीझनमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली होती. आता लवकरच अशनीर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो ‘MTV रोडीज-कर्म या कांड’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “वडील हे माझे एकमेव मित्र…” पहिला IIFA पुरस्कार जिंकल्यावर बाबिल खानला आली इरफान खान यांची आठवण, म्हणाला…

‘MTV Rodies’ च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शोचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला. यामध्ये अशनीरला टीम लीडरच्या खुर्चीत बसलेले पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘रोडीज’च्या पेजवर शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमध्ये भारतातील सर्व शहरांमधील ऑडिशनची झलक दिसू लागली आहे. नव्या सीझनमध्ये स्पर्धकांचा लिलाव करण्यात येणार असून या प्रोमोमध्ये गँग लीडर रिया चक्रवर्ती, प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्यात भांडण होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष अशनीर ग्रोव्हरने वेधले आहे. अशनीर एका स्पर्धकाला “तू भीख ही मांग रहा है भाई ले लो मेरे को” असे बोलत असल्याचे दाखवले आहे.

हेही वाचा : कमल हासन यांनी ‘द केरला स्टोरी’ला प्रोपगंडा म्हटल्यावर दिग्दर्शक सुदीप्तो सेन संतापले; म्हणाले, “चित्रपट न पाहता…”

‘रोडीज’च्या मेकर्सने प्रोमो रिलीज केल्यावर आता अशनीर ग्रोव्हरला प्रेक्षकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने कमेंटमध्ये “अशनीर कोणत्या लाइनमध्ये आलास तू?” तर दुसऱ्या एका युजरने “भाई तू हे काय करतोस?” असे प्रश्न त्याला विचारले आहेत.

अशनीर यापूर्वी ‘शार्क टँक इंडिया सीझन १’ मध्ये दिसला होता. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘शार्क टँक’च्या दुसऱ्या सत्रात तो दिसला नाही. याबाबत सांगताना अशनीर म्हणाला की, सोशल मीडियावर ‘शार्क टँक इंडिया सीझन १’ मधील सर्व शार्क अर्थात परीक्षकांना त्याने अनफॉलो केले आहे. पुढे शोमध्ये अशनीरची जागा अमित जैनने घेतली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashneer grover comeback on tv show appearance on mtv roadies promo sva 00