बिग बॉस १८ च्या ‘वीकेंड का वॉर’ या भागात भारत पे चा को फाऊंडर अशनीर ग्रोव्हर सहभागी झाला होता. याच भागात सलमान खान स्पर्धकांच्या आठवडाभराच्या वागणुकीनुसार त्यांना जाब विचारत त्यांची शाळा घेतो. यंदाच्या ‘वीकेंड का वॉर’मध्ये पाहुणा म्हणून सहभागी झालेल्या अशनीरलाही सलमानने चांगलेच खडेबोल सुनावले. त्यावर अशनीरने नुकतेच उत्तर दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सलमान अशनीरला काय म्हणाला ?
सलमान खानने ‘बिग बॉस वीकेंड का वार’मध्ये अशनीर याच्यावर थेट आरोप करत विचारले, “तुम्ही माझ्याबद्दल अनेकदा वक्त्यव्यं केली आहेत. तुम्ही म्हणालात, ‘सलमानला आम्ही एवढ्या रकमेवर साईन केलं’, पण ती आकडेवारी चुकीची होती. मग हा दुटप्पीपणा का?”
हेही वाचा…‘आई कुठे काय करते’फेम रुपाली भोसले झाली भावुक; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “समृद्धी घर…”
सलमान खानच्या या प्रश्नाला उत्तर देताना आपली बाजू सावरत अशनीर ग्रोवर म्हणाला, “जेव्हा तुम्हाला ब्रॅण्ड ॲम्बॅसेडर म्हणून घेतलं होतं तेव्हा मी आतापर्यंतचा सगळ्यात योग्य निर्णय घेतला आहे, असं मला वाटलं होतं.”
अशनीर ग्रोवरच्या या उत्तरावर सलमान खान म्हणतो, “आता तुम्ही नीट बोलत आहात. मात्र व्हिडीओमध्ये तुमचा अॅटिट्यूड फार वेगळा दिसतो आहे.” त्यावर स्पष्टीकरण देताना, “कदाचित पॉडकास्टमध्ये आवाज व्यवस्थित आला नसेल”, असं अशनीर ग्रोवर म्हणतो.
अशनीर ग्रोव्हरने यापूर्वी २०२२ मध्ये एका कार्यक्रमात सलमानबरोबरच्या एका भेटीचा अनुभव सांगताना त्याच्या मानधनाचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता की, “सलमान खान यांनी ७.५ कोटी मानधनाची मागणी केली. रक्कम कमी करण्याची विनंती केल्यावर त्यांच्या मॅनेजरने उत्तर दिलं, ‘भाजी विकत घ्यायला आला आहेस का? किती घासाघीस करशील?’”
सलमान खानने या विधानाचा उल्लेख करून, “तुमच्या आकडेवारीत काही तथ्य नाही. आणि तुम्ही त्या वेळी जो रोखठोक पवित्रा घेतला होता, तो आता दिसत नाही,” असं म्हणत अशनीरला सुनावले.
सलमानच्या वक्त्यव्यावर अशनीरची प्रतिक्रिया
सलमानने अशनीर ग्रोव्हरवर केलेल्या टीकेनंतर अशनीरने लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर करत प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. त्याने लिहिले, “बिग बॉसचा वीकेंड का वॉर एपिसोड पाहून प्रेक्षक खूप आनंदी झाले असतील, तसेच या एपिसोडचा टीआरपी देखील चांगलाच वाढला असेल. शोदरम्यानच्या सर्व विधानात तथ्य आहे. सलमान खान एक उत्कृष्ट होस्ट आणि अभिनेता आहेत. बिग बॉसच्या एपिसोडमध्ये कुठला आशय चालेल किंवा नाही चालणार, याची त्यांना उत्तम माहिती आहे. मी सलमान यांचं नेहमीच कौतुक केलं आहे; त्यांच्या व्यवसायाच्या आस्थेबद्दल कधीही अपमानास्पद विधान केलं नाही. माझ्या डील्सच्या आकडेवारीत चूक नाही. मी सलमान यांची २०१९ मध्ये जेडब्ल्यू मॅरियट, जुहू येथे एका ब्रँडसाठी ३ तास बैठक घेतली होती (तोपर्यंत मी प्रसिद्ध नव्हतो, त्यामुळे त्यांना आठवत नसेल कारण ते अनेक लोकांना भेटतात). बिग बॉससाठी मला आलेल्या निमंत्रणाबद्दल चेकही मिळाला. आणि अखेर मला त्यांच्याबरोबर फोटोही मिळाला !”
सलमानचा खोचक सल्ला
शोदरम्यान सलमानने अशनीरला स्पष्ट सल्ला दिला, सलमान म्हणाला, “तुमच्या वक्तव्यांमध्ये आणि प्रत्यक्ष वागणुकीत तफावत दिसते. स्वतःला कसं सादर करायचं, याबद्दल तुम्ही अधिक जागरूक असायला हवं.”
सलमान आणि अशनीरचा वाद संपणार?
बिग बॉसच्या मंचावर सलमान आणि अशनीर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे सलमानच्या रोखठोक शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन झाले, तर दुसरीकडे अशनीरने दिलेल्या स्पष्टीकरणाने वादाला वेगळे वळण मिळाले आहे.