सध्याच्या तरुण उद्योजकांसमोर अशनीर ग्रोव्हर ही व्यक्ती एक मूर्तिमंत उदाहरण आहे. उद्योग क्षेत्रात अशनीर यांनी केलेली प्रगती खूप कौतुकास्पद आहे. ‘शार्क टँक इंडिया’ या शोमुळे हे नाव घराघरात पोहोचलं आणि हा शो न पाहणाऱ्या लोकांनासुद्धा अशनीरच्या डायलॉगचे मीम्स आवडू लागले. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनमध्ये अशनीर नसल्याने बरेच चाहते नाराज झाले होते. पण एवढा मोठा सेलिब्रिटी असूनही अशनीर त्याच्या बायकोला घाबरतो याचा नुकताच एका मुलाखतीदरम्यान खुलासा झाला आहे.

नुकतंच अशनीरने पत्नी माधुरी जैनसह अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती अनमोल यांच्या युट्यूब चॅनलच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान यां दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याबरोबरच अशनीर आणि माधुरी यांनी त्यांची लव्हस्टोरीदेखील शेअर केली. याच मुलाखतीमध्ये अशनीरला एकेकाळी अभिनेत्री मौनी रॉयला अनफॉलो करावं लागलं असल्याचा एक किस्सा शेअर केला आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

आणखी वाचा : रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा केवळ प्रौढांसाठी; १८ वर्षांखालील मुलांना घ्यावी लागणार पालकांची लेखी परवानगी?

याबद्दल बोलताना अशनीर म्हणाला, “मी इंस्‍टाग्रामवर खूप कमी लोकांना फॉलो करतो. तर तेव्हा मौनी रॉय हिने बिकिनीमधला एक फोटो शेअर केला होता आणि मी त्या फोटोला लाइक केलं. हे पाहून माझी बायको माधुरी चांगलीच भडकली. मी फोटो लाइक केला ही समस्या नव्हती, मौनी रॉय बिकिनीमध्ये होती ही समस्या होती.”

अशनीरने सांगितलेला हा किस्सा ऐकून सगळेच खळखळून हसले. नंतर माधुरीने खोचक शब्दांत अशनीरला सांगितलं की, “तो फोटो लाइक करायची काय गरज होती?” अशी प्रचंड धमाल मस्ती अशनीर आणि त्याच्या बायकोने या मुलाखतीमध्ये केली. या घटनेनंतर अशनीरने मौनी रॉयसह दिशा पाटनी, सोनम बाजवा या अभिनेत्रींनाही अनफॉलो केल्याचंही स्पष्ट केलं.

Story img Loader