‘शार्क टँक इंडिया’ फेम उद्योगपती अश्नीर ग्रोव्हर सोशल मीडियावर चर्चेत असतो. अलीकडेच तो पत्नी माधुरी जैनबरोबर अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोलच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ शोमध्ये पोहोचला होता. यादरम्यान अशनीर ग्रोव्हर आणि माधुरीने मुंबईतील पहिल्या भाड्याच्या घरात राहतानाचे अनुभव सांगितले. तसेच माधुरीने पहिल्या गर्भधारणेतील गुंतागुंत आणि गर्भपाताबद्दल खुलासा केला.
हेही वाचा – “आम्ही एकत्र आंघोळ करायचो, कारण…”; अश्नीर ग्रोव्हरच्या पत्नीचा खुलासा
माधुरीने सांगितलं की तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये खूप गुंतागुंत होत्या, त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला होता. माधुरी म्हणाली, “माझी पहिली गर्भधारणा खूप गुंतागुंतीची होती. काही समस्या असल्याने मला गर्भपात करावा लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मी आणि अश्नीर बाळासाठी तयार होतो आणि जेव्हा तुम्ही तयार असाल आणि डॉक्टर गर्भपाताचा सल्ला देतात, ती परिस्थिती खूप वाईट असते, मन उदास होतं, पण तुमच्याकडे दुसरा पर्यायही नसतो.”
माधुरी म्हणाली की “मी आणि अश्नीर १६ वर्षांपूर्वी कामानिमित्त दिल्लीहून मुंबईला राहायला आलो होतो. आम्ही मुंबईला शिफ्ट झालो तेव्हा आमच्या घरात टेबलही नव्हते. आम्ही खाली बसून जेवायचो. आमच्या एका महिन्याच्या पगारातून आम्ही फर्निचर विकत घेतले होते. त्यानंतर अश्नीरने लकी ड्रॉमध्ये बाईक जिंकली होती. त्यावेळी आम्ही १६,००० रुपये घरभाडं द्यायचो.”
दरम्यान, अश्नीर व माधुरी यांची पहिली भेट दिल्लीत कोचिंगदरम्यान झाली होती. दोघांच्या लग्नाला १७ वर्षे झाली असून दोघांना दोन मुलं आहेत. अश्नीर ग्रोव्हर ‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या पर्वात दिसला होता. तर, दुसऱ्या पर्वात त्याची जागा अमित जैनने घेतली होती.