Ashok MaMa Colors Marathi New Serial : हिंदीसह मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण, आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. “येतोय ‘महाराष्ट्राचा महानायक’ लवकरच”, असं म्हणत ‘कलर्स मराठी’ वाहिनीने मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर काही दिवसांपूर्वी शेअर केली होती. आता या मालिकेच्या प्रदर्शनाची तारखेची अन् वेळेची घोषणा करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक सराफ टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘कलर्स मराठी’च्या ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकरदेखील या मालिकेत एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळेल. समोर आलेल्या प्रोमोमधील ( Ashok MaMa ) रसिका वाखरकरच्या अंदाजाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हेही वाचा : Video : रियान अन् राहिलचं बॉण्डिंग पाहून आई जिनिलीया भारावली! देशमुखांच्या सुनेने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

‘अशोक मा.मा.’ ( Ashok MaMa ) या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रसिका म्हणाली, “भैरवी मुजुमदार असं माझ्या पात्राचं नाव आहे. अतिशय स्ट्राँग, स्वतंत्र, उच्चशिक्षित, मॉर्डन अशी ही मुलगी आहे. त्यामुळे या मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. आधी साकारलेल्या सावीपेक्षा अतिशय वेगळं पात्र मी साकारणार आहे. अशोक मा.मा. या पात्राशी भैरवी वाद-विवाद घालताना दिसेल. अर्थात त्याला सुद्धा तितकचं स्ट्राँग कारण आहे. वेगळी गोष्ट असणाऱ्या या मालिकेची प्रेक्षकांप्रमाणे आता मलाही उत्सुकता आहे”.

रसिकाप्रमाणे या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची लेक देखील झळकणार आहे. लोकेश गुप्तेची लेक शुभवी या मालिकेतून पदार्पण करत आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोवर लोकेशने “खूप अभिमान आहे आहे शुभवी तुझा…तुझं खूप खूप अभिनंदन अशीच पुढे जा” अशी कमेंट करत लाडक्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “तू फक्त काही आठवड्यांची होतीस…”, लाडक्या लेकीच्या वाढदिवशी आलियाने शेअर केला २ वर्षांपूर्वीचा फोटो, राहाला म्हणाली…

दरम्यान, ‘कलर्स मराठी’ची ‘अशोक मा.मा.’ ( Ashok MaMa ) ही नवीन मालिका २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok mama new colors marathi serial starting from 25th nov starring these actors watch promo sva 00