‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या नव्या पर्वात नुकतीच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सर्व लिटिल चॅम्प्सबरोबर मज्जा मस्ती केली. तसेच त्यांनी काही किस्से सांगितले. मनोरंजनसृष्टीतील महान विनोदवीर म्हणजेच दादा कोंडके यांच्या आठवणींना देखील अशोक सराफ यांनी उजाळा दिला. यासंबंधिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “मातीशी जोडलेला एकमेव अभिनेता…”, संतोष जुवेकरची ‘ती’ पोस्ट पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे अशोक सराफ यांना म्हणतेय की, ‘मला तुमच्याकडून दादांबरोबरच्या कामाबद्दलच्या अनुभवाविषयी जाणून घ्यायचं आहे.’ तेव्हा अशोक सराफ म्हणतात की, “दादा कोंडकेंबरोबर मी तीन चित्रपट केले. पहिला ‘पांडू हवालदार’, दुसरा ‘तुमचं आमचं जमलं’ आणि तिसरा ‘रामराम गंगाराम’. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे दादा कोंडके आणि त्यांनी मला ‘पांडू हवालदार’ चित्रपटासाठी त्या भूमिकेसाठी घेतलं तो. वास्तविक त्यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांना कोणीतरी सांगितलं की, असा एक मुलगा आहे, जो चांगलं काम करतो. कोणीतरी अशोक सराफ म्हणून आहे. हे ऐकून त्यांनी मला त्या चित्रपटात घेतलं होतं. त्यांना माझ्याबद्दल काहीच माहित नव्हतं. मला नशीबाने मिळालेली ही गोष्ट होती.”

हेही वाचा – Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरांनी केलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चं नवीन व्हर्जन पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

“दादा एक ब्रिलियंट माणूस होते. हजरजबाबी पणा हा त्यांचा मोठा गुण होता. तुम्ही कितीही विनोद करा. पण शेवटचा विनोद हा त्यांचाच असला पाहिजे. त्यांना पटापट कसं सुचायचं ही आश्चर्याची गोष्ट होती. त्यावेळी मी त्यांच्याकडे सतत बघत बसायचो की, ते काय करतात. मला आयुष्यात एक चांगला जौहरी मिळाला एवढंच मी सांगेन,” असं अशोक सराफ म्हणाले.

दरम्यान, दादा कोंडकेच्या ‘पांडू हवालदार’ चित्रपटाने अशोक सराफ यांच्या कारकीर्दीला कलाटणी दिली. दादांचा विनोदाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी अशोक सराफ यांनी समर्थपणे पेलली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf share memories with dada kondke in sa re ga ma pa little champs pps